‘डेस्टिनेशन वेडिंग’ साठी सेलिब्रेटींकडून राजस्थानला पसंती

Destination Wedding: ‘डेस्टिनेशन वेडिंग’ (Destination Wedding) करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा वाड्यामध्ये ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याचा ट्रेंड सध्या अनेक जण फॉलो करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील परदेशात जाऊन लग्न केले होते. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी इटलीला जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले. नंतर मुंबईत भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. पण कोरोनानंतर परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड कमी झाला, असं पहायला मिळालं.  डेस्टिनेशन वेडिंगसाठी सध्या काही सेलिब्रिटी राजस्थानची निवड करत आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) जैसलमेर ( Jaisalmer), सवाई माधोपूर (Sawai Madhopur) येथे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्याचा निर्णय सध्या काही सेलिब्रिटी घेत आहेत. जाणून घेऊयात राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या जोडप्यांबाबत…
 

हेही वाचा :  Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा 'टर्री' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह सोहळा जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये पार पडला.  2018 मध्ये प्रियांकानं निकसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा गेल्या वर्षी राजस्थानमध्ये पार पडला. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विकी आणि कतरिनाचा विवाह सोहळा पार पडला.

शनेल इराणी (Shanelle Irani) आणि अर्जुन भल्ला (Arjun Bhalla) 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani)  यांची मुलगी शनेल इराणी (Shanelle Irani) काही दिवसांपूर्वी अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली आहे.  राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. 

कियारा आडवाणी (Kiara Advani)  आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधील एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

हेही वाचा :  Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Hardik Pandya Wedding : हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करतोय, उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …