Tag Archives: bollywood

प्रियांका चोप्राने ‘जॉयलँड’ चित्रपटाचं केलं कौतुक; शेअर केली पोस्ट

Priyanka Chopra: जॉयलँड (Joyland) हा पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आलं आहे. जॉयलँडचे दिग्दर्शन सॅम सादिक (Saim Sadiq) यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 नोव्हेंबरला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण नंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. आता या चित्रपटाचं अभिनेत्री …

Read More »

राधिका मर्चंटचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani Radhika Merchant Mehndi : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील …

Read More »

दाक्षिणात्य अभिनेत्रीला केरळमधील मंदिरात एन्ट्री मिळाली नाही; व्यक्त केल्या भावना

Amala Paul: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला (Amala Paul) केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. अमाला पॉलने आरोप केला आहे की, “धार्मिक भेदभावामुळे” तिला केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले.   अमाला पॉल ही सोमवारी (16 जानेवारी) मंदिरात दर्शनासाठी गेली होती. असं म्हटलं जात आहे की, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी प्रथेबाबत सांगितले की, …

Read More »

‘वेड’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

Ved Box Office Collection : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा वेड हा चित्रपट ‘वेड’ (Ved) हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली …

Read More »

आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती

Rakhi Sawant: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, “तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश …

Read More »

फोटोग्राफरवर भडकल्या जया बच्चन; म्हणाल्या…

Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल (17 जानेवारी) इंदूरच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे वर्च्युअली उपस्थित होते. नुकताच जया बच्चन यांचा इंदूर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहे, असं …

Read More »

कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिलात? सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की …

Read More »

फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का?

Celebs Childhood Pics: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?’, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट …

Read More »

‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात ओटीटीवर होणार रिलीज

This Week OTT Latest Release: जानेवारी महिन्यातील तिसरा आठड्यात ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या वीकेंडला  कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट …

Read More »

पठाण ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर होणार रिलीज

Pathaan OTT Release Date: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने  काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, …

Read More »

जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gina Lollobrigida: प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांचे निधन झाले आहे. जीना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्या अभिनेत्री आणि फोटो जर्नलिस्ट  होत्या. जीना लोलोब्रिगिडा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली.  जीना यांनी वयाच्या   95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  जीना या 50 आणि 60 के दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रिपोर्टनुसार,  काही महिन्यांपूर्वी  जीना यांच्या मांडीचे हाड मोडले …

Read More »

बुर्ज खलिफावर झळकला ‘पठाण’ चा ट्रेलर

Pathaan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रदर्शित झाली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या …

Read More »

‘शाहरुख खानचा चित्रपट म्हणून…’; ‘पठाण’ मधील बेशरम रंग गाण्याच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्

Sanjay Raut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. आता या वादावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी न्यूजच्या Press Conference या शोमध्ये संजय राऊत …

Read More »

Urfi Javed : उर्फी जावेदने केली देशाची तालिबानसोबत तुलना

Urfi Javed : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ या ट्विटर वॉरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाची आता पोलिसांनीदेखील दखल घेतली आहे. उर्फीने आज मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर एक ट्वीट करत देशाची तालिबानसोबत तुलना केली आहे.  मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर उर्फीने प्राचीन फोटो शेअर …

Read More »

Makar Sankranti 2023 : बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या खास शुभेच्छा!

Celebs Wishes Makar Sankranti : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. शिल्पा शेट्टीपासून (Shilpa Shetty) अर्जुन कपूरपर्यंत (Arjun Kapoor) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  अर्जुन कपूरने एक चांगलं कलात्मक पोस्टर इंस्टा स्टोरीवर ठेवलं आहे. या पोस्टरवर मकरसंक्रांतीच्या …

Read More »

प्रजक्ता माळीची खास पोस्ट

Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. प्राजक्ताच्या सोशल मीडिया पोस्ट या चर्चेत असतात. नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदसोबतचा (Sonu Sood) फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘पिकोलो’ चा ट्रेलर प्रदर्शित

Piccolo Official Trailer: जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ (Piccolo) हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  राजसाहेबांनी  चित्रपटाला  मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच …

Read More »

तालिबानच्या महिलांविरोधातील फतव्यांवर उर्फीचा हल्लाबोल

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोस्ट आणि फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आहे. भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता नुकतेच उर्फीनं तालिबानच्या फतव्याबाबत  एक ट्वीट शेअर केले. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  ‘तालिबानने पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर …

Read More »

Shah Rukh Khan : शाहरुखच्या ‘Pathaan’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार

Shah Rukh Khan Pathaan Trailer On Burj Khalifa : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे.  शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खान (King Khan) सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग …

Read More »

पठाणच्या ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ साठी शाहरुखच्या चाहत्यांनी केली जय्यत तयारी

Shah Rukh Khan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.  शाहरुख हा चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक आहे. पठाण …

Read More »