राधिका मर्चंटचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Anant Ambani Radhika Merchant Mehndi : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राधिका ही खास लूकमध्ये दिसत आहे. तसेच राधिकाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका ‘घर मोरे पिया पर किया’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

मेहंदी सोहळ्यासाठी राधिकाने केला खास लूक

राधिकाने मेहंदी सोहळ्यासाठी फ्यूशिया पिंक कलरचा फ्लोरल रेशम एम्ब्रॉएडर्ड लहंगा परिधान केला होता. तसेच तिनं चोकर नेकलेस, मॅचिंग इअरिंग्स आणि बिंदी अशा ज्वेलरी देखील परिधान केल्या होत्या. राधिकाने फिशटेल हेअरस्टाईल केली होती, ज्यामध्ये आर्टिफिशल फ्लोवर्स लावण्यात आले होते. राधिकाच्या या मेहंदी लूकने अनेकांचे लक्ष वेधले. 


news reels New Reels

डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मेहंदी सोहळ्यात राधिकानं कलंक चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर डान्स केला. राधिकाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा :  ती व्यक्ती जबरदस्तीने...; कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Who is Radhika Merchant: अंबानींची होणारी सून राधिका कोण आहे? जाणून घ्या अनंतसोबत तिची पहिली भेट कधी झाली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …