अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुड्याला ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

Anant Radhika Engagement : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (17 जानेवारी) मेहंदी सोहळा पार पडला. तर गुरवारी (19 जानेवारी) राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला.  राधिका आणि अनंत यांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबासह पोहोचला होता. शाहरुख खानची पत्नी गौरी आणि  मुलगा आर्यन यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखपुड्याला हजेरी लावली. 

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी देखील अनंत  आणि राधिका यांच्या   साखपुड्याला उपस्थिती लावली. दीपिका लाल रंगाच्या साडीत तर रणबीर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.

news reels
New Reels


अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्याला खास लूक केला होता. 

 अनंत  आणि राधिका यांच्या   साखपुड्यासाठी सारानं ऑल व्हाईट लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. 

हेही वाचा :  कमल हसन रुग्णालयात दाखल; चेन्नईमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

तसेच करण जोहर, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय यांनी देखील अनंत  आणि राधिका यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली. 


मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. गोल धना आणि चुनरी विधी (Gol dhana and Chunari Vidhi) या  परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं.  

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता. यानंतर अंबानी कुटुंबाने मुंबईत एंगेजमेंट पार्टीही आयोजित केली होती. लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Radhika Merchant Mehndi: राधिका मर्चंटच्या हातावर रंगली अनंत अंबानीच्या नावाची मेहंदी; ‘घर मोरे परदेसिया’ वरील डान्सचा Video Viral



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …