‘मी उडी मारतो, तुम्ही व्हिडीओ काढा,’ स्टंटच्या नादात मृत्यूच झाला कॅमेऱ्यात कैद, खडकांमधील मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Viral Video: सध्या सोशल मीडिया (Social Media) म्हणजे प्रतेकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सोशल मीडियावर आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी अनेकदा तरुण जीव धोक्यात टाकत असतात. त्यातही सध्या रिलचा जमाना असल्याने तिथे ट्रेंडिग ऑडिओवर साजेसा व्हिडीओ टाकता यावा यासाठी प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न असतो. अशाच प्रयत्नात चेन्नईतील एका तरुणाने आपला जीव गमावला असून ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 22 वर्षीय तरुणाने पाण्यात उडी मारल्यानंतर बराच वेळानंतरही तो वरती न आल्याने मित्रांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. दरम्यान, शोध घेतला असता दोन दगडांमध्ये त्याचा अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. 

चेन्नईमधील (Chennai) 22 वर्षीय विद्यार्थी आपल्या मित्रांसह तिरुपतीजवळ असणाऱ्या तळकोना धबधब्यावर (Talakona Waterfall) गेले होते. सुमंथ असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा कर्नाटकच्या मंगळुरुचा आहे. आपल्या मित्रांसह पिकनिकच्या निमित्ताने तो धबधब्यावर आला होता. 

सुमंथ यावेळी पाण्यात उडी मारण्यासाठी उंचावर गेला होता. यावेळी इन्स्टाग्राम रिलसाठी त्याने आपल्या मित्रांना पाण्यात उडी मारताना व्हिडीओ शूट करण्यास सांगितलं. त्यानुसार त्याच्या मित्रांनी कॅमेऱ्यात व्हिडीओ रेकॉड्र करण्यास सुरुवात केली होती. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, सुमंथ वर कड्यावर गेला आणि 10 ते 15 फूट अंतरावरुन पाण्यात उडी मारली. 

हेही वाचा :  कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

पाण्यात उडी मारल्यानंतर कदाचित तो खाली आपटला असावा. कारण नंतर तो वरती येण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पण नंतर तो बराच वेळ पाण्यातून बाहेर आला नाही तेव्हा त्याचे मित्र घाबरले. त्याचा शोध लागत नाही हे लक्षात आल्यानंतर मित्रांनी पोलीस आणि वन विभागाकडे धाव घेतली. 

यानंतर बचावपथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि सुमंथचा शोध सुरु केला. बराच शोध घेऊनही मृतदेह सापडत नव्हता. त्यात अंधार झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आलं. यानंतर शनिवारी सकाळी सुमंथचा पाण्याच्या खाली मृतदेह सापडला. त्याचं डोकं दोन दगडांच्या मधोमध अडकलेलं होतं. दगडात अडकल्याने श्वास गुमदरुन त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. 

सुमंथ हा चेन्नईमदील राजीव गांधी कॉलेजात शिक्षण घेत होता. गेल्या काही महिन्यात या धबधब्यावर घडलेली अशा प्रकारची ही तिसरी दुर्घटना आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …