फक्त ८०० रुपये कमावणाऱ्या नीता अंबानींसमोर धीरूभाईनी ठेवली ‘ही’ अट, मग मुकेश अंबानींच्या होकारावर झालं लग्न

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या कुटुंबाच्या घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सर्वांचे लक्ष असते. मुकेश अंबानी यांच्या यशाचे श्रेय नीता अंबानीना दिले जाते. या दोघांचे नाव खूप सन्मानाने घेतले जाते. ८ मार्च १९८५ रोजी विवाह बंधनात अडकल्यानंतर मागील ३७ वर्षात मुकेश अंबानी यांची जी भरभराट झाली आहे त्यामध्ये त्यांच्या जोडीदाराचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. पण तुम्हाला माहित आहे का या श्रीमंत कुटुंबाच्या सूनेची निवड कशी करण्यात आली. सर्वात श्रीमंत अंबानी परिवाराने एका मध्यमवर्गीय घरातील मुलीला सून म्हणून का पसंत केलं असावं ? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. नेहमीच प्रसन्न मुद्रा असलेल्या नीता यांना सर्वप्रथम धीरूभाई अंबानी यांनी ‘बिर्ला मातोश्री’ येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमात नृत्य करतांना बघितलं होतं. धीरूभाई आणि कोकिलाबेन अंबानी हे दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. (फोटो सौजन्य : योगेन शाह, @radhikamerchant_)

​अशी झाली सासू सासऱ्यांची पहिली भेट

‘बिर्ला मातोश्री’ येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमात नीता अंबानी यांना त्यांनी नृत्य करतांना बघितलं होतं. दूरदृष्टी असलेल्या धीरूभाई अंबानी यांना तेव्हाच कळलं होतं की, नीता याच आपल्या घरासाठी सून म्हणून परफेक्ट आहेत. त्यावेळी धीरूभाई अंबानी यांनी हे बघितलं नाही की, नीता या सध्या एका शाळेत शिक्षिका आहेत आणि त्यांचा पगार हा केवळ ८०० रुपये इतका आहे.

हेही वाचा :  हातात ड्रिंक-सिगार घेऊन बर्फाळ डोंगरावर महिला टॉपलेस, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची स्टाईल व्हायरल

धीरूभाई अंबानी यांनी नीता यांना बघितल्यानंतर त्यांच्या घरी फोन केला. लँडलाईन फोनच्या त्या काळात नीता यांच्या वडिलांनी तो आलेला फोन हा धीरूभाई अंबानी यांचाच आहे याची खात्री केली आणि मग या ‘अरेंज्ड मॅरेज’ची गोष्ट पुढे सरकली. (वाचा :- सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी वाचून डोळे पाणवतील )

​लग्नाची मागणी कोणी घातली ?

नफा, तोटा, आकडे यामध्ये तरबेज असलेल्या मुकेश अंबानी यांनी इथेसुद्धा बाजी मारली आहे. एके दिवशी नीता आणि मुकेश संध्याकाळी मुंबईतील पेडर रोडवरून जात असताना त्यांची गाडी ट्रॅफिक सिग्नलवर थांबली, तेव्हा मुकेशने नीताला फिल्मी स्टाईलमध्ये विचारले. , तू माझ्याशी लग्न करशील का? यावर नीताने लाजत मुकेशला गाडी चालवण्यास सांगितले. मात्र मुकेश अंबानी यांनी नीता यांना सांगितले की, जोपर्यंत ती उत्तर देत नाही तोपर्यंत मी गाडी चालवणार नाही. यानंतर नीता यांनी मुकेशचा प्रस्ताव स्वीकारला. आणि त्यांच्या सुखी आयुष्याला सुरवात झाली.

​नीता यांनी ठेवली ही अट

या लग्नात नीत यांनी देखील एक अट ठेवली होती. नोकरी करणं सोडणार नाही ही अट नीता यांनी मुकेश सरांसमोर ठेवली होती. त्यांनी ती अट सुद्धा मान्य केली. लग्नानंतरही नीता अंबानी यांनी काही वर्ष शाळेत शिक्षिकेची नोकरी सुरू ठेवली होती. गरोदरपणामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. मात्र माझ्यासारखं सामान्य माणसासारखं जगणार असाल तर मी तुमच्याशी लग्न करेल अशी एक अट नीता यांच्यासमोर ठेवली होती. मुकेश अंबानी हे करायला सुद्धा तयार झाले आणि त्यांनी मुंबईतील डबल-डेकर बसमधून प्रवास करणे, चौपाटीवर जाऊन पाणी पुरी खाणे हे सर्व त्यांनी आवडीने केलं.

हेही वाचा :  मुकेश आणि नीता अंबानी यांनी मुलांना दिला महत्त्वाचा धडा, ती एक गोष्ट ठरली आयुष्याची गुरुकिल्ली

​​नेहमी एकमेकांना आधार देतात

कोणत्याही परिस्थीतीत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी एकमेकांना साथ देताना दिसतात, मग ते व्यवसायाशी संबंधित असो किंवा कुटुंबाशी संबंधित, दोघेही सर्व गोष्टी एकत्र असतात.जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजते की त्याच्यासोबत कोणीतरी आहे तेव्हा तो भावनिकदृष्ट्या खंबीर राहतो. त्यावेळी अर्धपेक्षा जास्त टेन्शन निघून जाते. त्यामुळे तुम्हा देखील तुमच्या जोडीदाराला अशीच साध द्या. (वाचा :- त्या दिवशी नात्यासाठी सुधा मूर्तींनी ‘ते’ खास काम केलं नसते तर, आज इन्फोसिससारखं साम्राज्य उभंच राहिलं नसतं )

​सासऱ्यांशी उत्तम नाते

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे सासरे धीरूभाई अंबानी यांच्याशी खूप चांगले संबंध होते. धीरूभाई अंबानी यांच्याशी राजकारण, समाज, बाजार या सर्व विषयांवर ते मोकळेपणाने बोलत असत. इतकंच नाही तर रोज सकाळी धीरूभाई अंबानी नीता यांना शेअर मार्केट, रिलायन्स, इंटरनॅशनल अफेअर्स इत्यादींवर प्रश्न विचारायचे.

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत नीता अंबानी म्हणाल्या होत्या की, ‘बाबांच्या प्रश्नांसाठी मी एक दिवस आधीच पूर्ण तयारी करत असे. तो कुठून विचारेल याची कल्पना नव्हती. नीता अंबानींच्या म्हणण्यानुसार, त्या अनेकदा यासाठी अभ्यास करत असत. पुढे त्या म्हणाल्या की कितीही तयारी केली तरी दुसऱ्या दिवशी विचारले जाणारे प्रश्न पूर्णपणे वेगळे असायचे तरीही मी उत्तर देण्याचे धाडस करायचे. (वाचा :- सलमान खानने त्याची EX संगीता बिजलानीला सर्वांसमोर केले किस, वयाच्या ५७ व्या वर्षी सलमान खान पुन्हा प्रेमात ?)

हेही वाचा :  Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …