ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांची पहिली झलक, मुकेश-नीता यांनी आजी-आजोबा म्हणून केल्या ‘या’ खास गोष्टी

ईशा अंबानीने एक महिन्यापूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला. अंबानी- पिरामल कुटुंबासोबत संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बाब होती. ईशाच्या जुळ्या मुलांच्या जन्माची गोष्ट खूप चर्चेत आली. ईशाने आपल्या मुलांना लॉस एंजेलेसमध्ये जन्म दिला. यानंतर ती पहिल्यांदाच आज बाळांना घेऊन मुंबईत आली आहे.

मुंबई ईशा आणि दोन्ही बाळं आल्यानंतर त्यांच जंगी स्वागत झालं. यावेळी बाळांची पहिली झलकही पाहायला मिळाली. अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबातील लोकं बाळांच्या स्वागतासाठी एअरपोर्टला पोहोचले होते. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी, अजय पीरामल आणि स्वाती पीरामल या आजी-आजोबांचा उत्साह देखील पाहण्याजोगा होता. (फोटो सौजन्य – योगेन शाह)

​ईशा अंबानीच्या जुळ्यांची नावे

ईशा अंबानीने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी बाळांना जन्म दिला. ईशाला जुळी मुलं झाली असून एक मुलगा आणि एक मुलगी अशी ही गोंडस मुलं आहेत. ईशा आणि आनंदने २०१८ मध्ये लग्न केलं. यानंतर या दोघांना दोन गोंडस बाळं झाल्याची बातमी समोर आली.

हेही वाचा :  पायावर काळे-निळे चट्टे उठले, डॉक्टरांनाही निदान सापडलं नाही, अखेर नऊ दिवसांनी मुलीचा मृत्यू

ईशाने आपल्या जुळ्या मुलांच नाव आदिया आणि कृष्णा असं ठेवलं आहे. या दोघांच्या नावाचा अर्थ देखील खूप खास आहे. आदिया म्हणजे पहिली शक्ती आणि कृष्णा हे परमेश्वराचे नाव आहे. या दोन्ही मुलांची नावे अतिशय चर्चेत होती. या दोघांची पहिली झलक आज पाहायला मिळालं. या नावांचा अर्थ देखील खास आहे.

​ईशाच्या दोन्ही मुलांची पहिली झलक

ईशाची दोन्ही मुले आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर आली. आतापर्यंत या दोघांचा एकही फोटो जगासमोर आला नव्हता. त्यामुळे अंबानी आणि पीरामल कुटुंबियांच्या नातवंडांची पहिली झलक जगासमोर आली आहे. आजी-आजोबा आणि नातवंड यांचं खास नातं अनुभवता येणार आहे. आजी-आजोबांच नातवंडांशी कायमच खास नातं असतं. ते आणखी घट्ट करण्यासाठी फॉलो करा या टिप्स.

(वाचा – वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? जाणून घ्या या वयात नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती)

​नातंवंडांसाठी काहीही करायला तयार

मुकेश अंबानी यांनी नातवंडांसाठी स्वतः गाडी चालवून तो प्रवास केला. ही गोष्ट प्रत्येक आजोबासाठी खास असते. जी आपल्याला मुकेश अंबानी यांच्यात आजोबा म्हणून पाहायला मिळाली. आजी-आजोबा यांचं वय लक्षात घेता त्यांची काळजी करणे गरजेचे असते. पण या काळात हे लोकं नातवंडांसाठी काहीही करायला तयार असतात. अगदी मुलांसोबत गार्डनमध्ये खेळण्यापासून ते त्यांना उचलून घेऊन चालत फिरेपर्यंत. अनेकदा पिकनिकमध्ये या आजी-आजोबांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो.

हेही वाचा :  अंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?

(वाचा – पतीपासून दूर राहूनही ‘या’ पद्धतीने व्हा प्रेग्नेंट, इनफर्टिलिटीला मिळालं वरदान)

​आजी-आजोबांच प्रेम का आवश्यक?

हल्ली कपल्स एकाच मुलाचा विचार करतात. त्यामुळे मुलांना पालकांच प्रेम भरभरून मिळतं. असं असलं तरीही आजी-आजोबांच प्रेम हे अतिशय खास असतं. आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बॉन्ड हा खास असतो. कारण आजी-आजोबा देखील नातवंडांमध्ये अधिक गुंततात. ते नातवंडांना कधीच ओरडत नाहीत. त्यामुळे मुलं देखील अतिशय निख्खळ प्रेम अनुभवत असतात.

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

​नातवंड आजी-आजोबांकडून शिकतात खास गोष्टी

कपल पालक म्हणून मुलांवर संस्कार करत असतातच पण आजी-आजोबांनी केलेले संस्कार महत्वाचे असतात. आजी-आजोबा नातवंडांना निरागस प्रेम करायला शिकवतात. यांनी सांगितलेली गोष्ट मुलं देखील लगेच स्विकारतात. जसे की, सगळी फळे खाणे, रोज देवासमोर नतमस्तक होणे.

(वाचा – गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? वयानुसार काय जाणवतात समस्या)

​आजी-आजोबांच्या कथा

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यातील प्रेम अनुभवयाचं असेल तर त्यांच्या गोष्टीच्या वेळी तेथे आवर्जून बसा. आजी-आजोबा आणि नातवंडं देखील त्या कथेत मनापासून रमतात. ही सगळेजण कळत नकळत आपली गोष्टच एकमेकांनासोबत शेअर करत असतात. या गोष्टींमधून कळत नकळत मुलांवर खूप छान संस्कार होत असतात.

हेही वाचा :  दिराच्या लग्नात भाव खाऊन गेली ईशा अंबानी,बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या

(वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीने जाहीर केलं बाळाचं नाव आणि पहिला फोटो)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …