अभिनेता आयुष्मान खुराना लावणार ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’मध्ये हजेरी

ABP Network Ideas Of India Summit 2023 : ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ (ABP Network Ideas Of India Summit 2023) हा एबीपी नेटवर्कचा (ABP Network) कार्यक्रम आज पार पडणार आहे. ‘नया इंडिया, लुकिंग इनवर्ड, रिचिंग आऊट’ अशी या कार्यक्रमाची थिम आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान, हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रम अभिनेता आयुष्मान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) सहभागी होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ समिटमध्ये सहभागी होत बॉलिवूडसंबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहे.  या कार्यक्रमात आयुष्मान बदलते बॉलिवूड सिनेमे, बॉलिवूडच्या सिनेमांचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. 

आयुष्मान खुरानाबद्दल जाणून घ्या… (Ayushmann Khurrana Information)

अभिनेता, गायक असणाऱ्या आयुष्मान खुरानाने सामाजिक क्षेत्रातदेखील मोलाचे योगदान दिले आहे. नुकतीच युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे. आता तो अनेक गरजू मुलांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणार असून या मुलांच्या समस्या सोडवण्याचादेखील प्रयत्न करणार आहे. 

हेही वाचा :  'पठाण'ला विरोध; चाहत्यांमध्ये शाहरुखची क्रेझ कायम!

आयुष्मान खुराना आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक रिअॅलिटी शो केल्यानंतर त्याने 2012 साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. शूजित सिरकरचा ‘विक्की डोनर’ हा त्याचा पहिला सिनेमा. त्यानंतर 2015 साली तो ‘दम लगा के हैशा’ या सिनेमात झळकला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 

‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’मध्ये ‘या’ दिग्गजांचा सहभाग

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस, गीतकार जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताव घोष आणि देवदत्त पट्टनाईक, अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगट यांसह अनेक दिग्गज ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट या कार्यक्रमाची सह-प्रस्तुती डाबर वैदिक टीद्वारे करण्यात आली आहे. तसेच डॉ. ऑर्थो, गॅलंट अॅडव्हान्स आणि राजेश मसाला (मारुती सुझुकी आणि टेक पार्टनर पॅनासोनिक) हे या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत. 

हेही वाचा :  ...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ABP Network Ideas of India Summit 2023: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर लावणार ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ मध्ये हजेरी; विविध विषयांवर करणार चर्चा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …