हातात ड्रिंक-सिगार घेऊन बर्फाळ डोंगरावर महिला टॉपलेस, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीची स्टाईल व्हायरल

लंडन : अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री चेल्सी हँडलर सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हल्लीच चेल्सीने तिचा 47 वा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला. ज्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. तेच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओपाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत चेल्सी टॉपलेस दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना चेल्सीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘माझ्या प्रिय व्यक्तीसोबत सर्व काही.’

25 फेब्रुवारीला अमेरिकन अभिनेत्री चेल्सी हँडलरचा वाढदिवस होता. हा दिवस साजरा करण्यासाठी चेल्सी बर्फाळ पर्वतांवर गेली. 47 वर्षीय चेल्सीसोबत तिचा बॉयफ्रेंड जो कोयही होता.

तिचा बॉयफ्रेंड जो कोय हा देखील अमेरिकेचा आहे आणि व्यवसायाने तो स्टँडअप कॉमेडियन आहे.

अभिनेत्रीने तिचा वाढदिवस बर्फाळ भागात साजरा केला

तिच्या वाढदिवसानिमित्त, चेल्सी हँडलर बॉयफ्रेंड जो कोयसोबत बर्फाळ पर्वतांमध्ये स्कीइंग करताना दिसत आहे.  तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनच्या व्हिडीओमध्ये ती टॉपलेस दिसत आहे आणि तिच्या हातात ड्रिंक आणि सिगरेट दिसत आहे.

जे पाहून सगळेच थक्क झाले आहे. इतक्या गोठवणाऱ्या थंडीत चेल्सीने विनाकपडे स्कीइंग करण्याचे धाडस दाखवले तरी कसे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना देखील पडला आहे.

हेही वाचा :  SBI मध्ये अकाऊंट आहे? आता फक्त SMS किंवा मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स, स्टेटमेंट जाणून घ्या, वाचा कसं?

तथापि, अभिनेत्री चेल्सी हँडलरने असे फोटो किंवा व्हिडीओशूट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीच्या सुरुवातीस, चेल्सीने बिकिनीमध्ये स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये देखील ती हातात दारुची बॉटल आणि ग्लास घेऊन उभी आहे.

डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, चेल्सी आणि जो कोय गेल्या 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …