कार्तिकचा ‘शहजादा’ सुपरफ्लॉप! वीकेंडला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला

Shehzada Box Office Collection Day 3:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)   हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा  ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत.  तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शहजादा चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे.  

शेहजादाचं कलेक्शन 

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन  (Kriti Sanon) यांच्या शहजादा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ‘शहजादा चित्रपटानं ओपनिंग-डेला 6 कोटींची  कमाई केली. हा चित्रपट वीकेंडला चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. शनिवारी (18 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतामध्ये 6.65 कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (19 फेब्रुवारी) म्हणजेच तिसऱ्या दिवशी 7.55 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई आता 20.20 कोटी झाली आहे.’ अशी माहिती तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली.  हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच कार्तिकच्या चाहत्यांना मिळेल.


शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon)  यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा रोमॅंटिक चित्रपट असला तरी या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलो’  हा चित्रपट रिलीज झाला होता. 

हेही वाचा :  Baloch : मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच'!

काही दिवसांपूर्वी दुबईमधील बुर्ज खलिफावर कार्तिकच्या शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर झळकला. त्यावेळी कार्तिकनं बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘मला शेहजादा झाल्यासारखं वाटतं आहे. टॉप ऑफ द वर्ल्ड’ 

महत्वाच्या इतर बातम्या : 

‘पठाण’ नंतर आता ‘शहजादा’ झळकला बुर्ज खलिफावर ; कार्तिक आर्यनकडून खास व्हिडीओ शेअर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …