Himalaya Sinking: आणखी एक जोशीमठ; आता संपूर्ण हिमालयच धोक्यात; Alert वाचूनच हादराल

Joshimath Sinking : उत्तराखंड (Uttarakhand), एक असं राज्य जे तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच आणखीही बऱ्याच कारणांनी चर्चेत असतं. इतकंच नव्हे, तर या राज्यामध्ये असणारी सकारात्मक उर्जा अनेकांनाच जीवनातील योग्य वाटेवर जाण्याची प्रेरणा देतं देतच राज्य आता मरणयातना सोसत आहे. उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath) हा अतिशय महत्त्वाचा भाग दिवसेंदिवस खचत चालला आहे. ज्यामुळं प्रशासनानंही इथल्या स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथं जोशीमठ गुदमरत असतानाच आता देशाची चिंता वाढवणारा आणखी एक मुद्दा भूगर्भशास्त्रज्ञांनी प्रकाशात आणला आहे. (Amid joshimath sinking gradual subsidence government says Himalayan geology is unstable and dynamic)

केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार हिमालय (Himalayan Ranges) पर्वतरांगांमधील बहुतांश भाग सध्या प्रचंड अस्थिर आहे. शिवाय या भागामध्ये अनेक हालचाली सुरु असल्यामुळं येत्या काळात इथंही भूस्खलनाच्या घटना घडू शकतात. या भागातील जमीन हळुहळू आपली मूळ जागा गमावत असून, ती काही फरकानं पुढेही सरकत आहे अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

हेही वाचा :  VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

संसदेत पोहोचलं जोशीमठ प्रकरण 

नुकतंच संसदेमध्ये जोशीमठ मुद्द्यावरुन झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MES) कडून एका लिखित पत्रकातून दिलेल्या माहितीनुसार इथं भूगर्भामध्ये असणाऱ्या हालचाली पाहता कोणत्याही मोठ्या बांधकामासाठी सर्वप्रथम पर्यावरण मंत्रालाची परवानगी अनिवार्य असेल. असं असलं तरीही सद्यस्थितीला सुरु असणाऱ्या अवैध बांधकामांवर मात्र मौन पाळलं गेलं. 

जोशीमठचा भूभाग कशापासून तयार झाला आहे? 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जोशीमठ हे भूस्खलनातून तयार झालेल्या भूखंडावर स्थिरावलेलं आहे. ज्यामुळं गा भूभाग सातत्यानं खचण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 1976 मध्ये महेश चंद्र मिश्रा यांच्या एका समितीनंही याबाबतचा अहवाल सादर केला होता. 

सदर भागात बांधकामांवर नियंत्रण नव्हतं 

पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जोशीमठ असो किंवा हिमालयीन पर्वतरांगांच्या कुशीत असणारा इतर भाग असो, इथं कधीच रेसिडेंशियल किंवा कमर्शियल बांधकामावर पूर्ण बंदी घालण्यात आली नव्हती. पण, तरीही स्थानिक प्रशासनं स्वत:च्या बळावर असे निर्णय घेऊ शकतात. याव्यतिरिक्त इतर प्रश्नांची उत्तरं देत त्यांनी उत्तराखंड सरकारनं आतापर्यंत जोशीमठमधून जवळपास 995 नागरिकांना स्थलांतरित केल्याची माहिती दिली. 

हेही वाचा :  Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...

उत्तराखंडमागोमाग जम्मू काश्मीरमध्येही घरांना तडे

जोशीमठमध्ये दिसणारं चित्र सध्या जम्मू काश्मीरमध्येही दिसण्यास सुरुवात झाली असून, इथं असणाऱ्या ठठरी डोडामध्ये तत्सम परिस्थितीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सततच्या हिमवृष्टीदरम्यान घरांना पडलेल्या मोठाल्या भेगांमुळं स्थानिक आणि प्रशासनाच्याही अडचणी वाढल्या आहेत. सदरील तक्रारींचं वाढतं प्रमाण पाहता ठठरी प्रशासनानं हा भाग Red Zone म्हणून घोषित केला. पण, स्थानिकांनी मात्र आपल्या घरांतून निघण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …