Pancard : Pancard हरवलंय? मग काळजी करू नका, फॉलो करा ‘या’ स्टेप्स!

Pancard Update:  पॅनकार्ड (Pancard) आता सर्वांसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट किंवा कागदपत्र बनलेला आहे. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कामासाठी पॅनकार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड घेणे, पीएफ खात्यासाठी इत्यादी अनेक कामांसाठी पॅनकार्डचा वापर महत्वाचा आहे. त्याच बरोबर आर्थिक व्यवहारासाठीही ते महत्वाचे आहे. 50 हजारांहून अधिक व्यवहारांसाठी, आयकर विवरणपत्र भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक असते.

अनेकदा पॅन कार्ड हरवले किंवा चोरीलाही जाते. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात की, त्याचा कोणी गैरवापर करू करेल का? अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पॅन कार्ड हरवल्यास, तुम्ही काही मिनिटांत तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच अशा परिस्थितीत पहिल्यांदा तुम्ही त्याची नोंदणी करून घ्यावी. यासोबतच तुम्ही ही माहिती पॅनकार्ड ऑफिसलाही देऊ शकता. याच्या मदतीने तुमच्या पॅनकार्डमधून काही चुकीची गोष्ट घडली तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. यानंतर तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता आणि नवीन पॅन कार्ड देखील मिळवू शकता.

वाचा: SBI Card वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ शुल्कात होणार वाढ! 

हेही वाचा :  एक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून...

आधी पोलिस तक्रार करा

तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास तुम्ही ताबडतोब तुमच्या स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि प्रथम माहिती अहवाल (FIR) तक्रारीची प्रत घ्या. यामुळे कोणीही तुमचा पॅन वापरून फसवणूक करू शकणार नाही.

ई-पॅन कार्ड घरी बसून डाउनलोड करू शकता:-

– सर्व प्रथम TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– आता https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ला भेट द्यावी लागेल.
– आता येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल, आणि नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील येथे भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीखही येथे टाकावी लागेल.  
– त्यानंतर तुम्हाला नियम आणि अटींवर क्लिक करावे लागेल आणि येथे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. या नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, जो तुम्हाला इथे टाकावा लागेल. 
– आता ‘कन्फर्मेशन’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल, जे तुम्ही ऑनलाइनद्वारे करू शकता. पेमेंट केल्यानंतर, तुमच्या ई-पॅन कार्डची PDF डाउनलोड केली जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकून ते उघडू शकता.

हेही वाचा :  भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …