भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार

IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर विभागात काम करुन देशसेवा करण्याचा विचार तुमच्याही मनात आला असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या तांत्रिक विभागात कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीची पदे भरली जाणार आहेत.

यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या भरतीतून एकूण 226 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज करू शकता.

हेही वाचा :  Video- कंगनाच्या ‘Lock Upp’ मध्ये लागला अडल्ट चित्रपट निर्मितीचा आरोप, पूनम पांडे म्हणते…

कसा कराल अर्ज?

IB ACIO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जा.  वेबसाइटच्या होम पेजवर What’s New या लिंकवर क्लिक करा. यानंतर IB ACIO असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड II/टेक्निकल 2023 च्या लिंकवर क्लिक करा. होमपेजवर नोंदणी येथे पर्यायावर जा. यानंतर मागितलेले तपशील भरा आणि नोंदणी करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. 

अर्ज शुल्क किती?

अर्ज शुल्क जमा झाल्यानंतरच अर्जाची पुढील प्रक्रिया होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या. त्यामुळे अर्ज करण्यासाठी शुल्क जमा करणे आवश्यक आहे.  सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांकडून 200 रुपये तर एससी आणि एसटी उमेदवारांकडून 100 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.  महिला उमेदवारांकडून देखील 100 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. 

किती मिळेल पगार 

गुप्तचर विभागात विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची निवड ही  GATE स्कोअरवर आधारित असेल. यामध्ये गेट स्कोअरचे 1000 गुण आणि मुलाखतीसाठी 175 गुण आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर 7 अंतर्गत पगार दिला जाणार आहे. म्हणजेच उमेदवारांना 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  पगाराव्यतिरिक्त तुम्हाला अनेक सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे. 

हेही वाचा :  IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सरकारी नोकरी अशी मिळवा... 'हे' आहेत पर्याय

अर्जाची शेवटची तारीख

23 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 12 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 12 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज शुल्क भरता येणार आहे तर 16 जानेवारी 2024 पर्यंत चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …