मनोरंजन

Disha Patani : दिशा पटानीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शूटिंग पूर्ण

Ek Villain Returns : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या सिनेमात दिसणार आहे. आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.  ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचे दिग्दर्शन मोहित सुरीने केले आहे. दिशा पटानी, तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. …

Read More »

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. आज पत्रलेखाचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजकुमारने पत्रलेखाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे,”पत्रलेखा, वाढदिवसाच्या शुभेच्छा..आय लव्ह यू”. राजकुमारच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स …

Read More »

Tiger Shroff : टायगर श्रॉफने शेअर केला ‘Poori Gal Baat’ गाण्याचा टीझर

Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत आहे. अशातच त्याने त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. ‘पुरी गल बात’ ‘Poori Gal Baat’ असे या गाण्याचे नाव आहे. लवकरच टायगरची अनेक रोमॅंटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये टायगर श्रॉफ मौनी रॉयसोबत …

Read More »

Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर साधला निशाणा

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या चर्चेत आहे. अशातच कंगनाने पुन्हा एकदा आलिया भट्ट आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर निशाणा साधला आहे. कंगना आलियाला ‘बिंबो’ आणि ‘पापा की परी’ म्हणाली आहे.  कंगनाने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली, “संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील कास्टिंग चुकीचे आहे. येत्या शुक्रवारी …

Read More »

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. तर 11 मार्च 2022 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Koo App ’THE KASHMIR FILES’ TRAILER ARRIVES TOMORROW… #TheKashmirFilesTrailer drops tomorrow [21 Feb 2022]… Directed by #VivekRanjanAgnihotri… In …

Read More »

Shah Rukh Khan : किंग खानला सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये पाहून चाहते घायाळ, केली ‘ही’ कमेंट

Shah Rukh Khan new look : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये झिरो (Zero) या चित्रपटात दिसला होता. दिर्घ काळानंतर शाहरुख आता अभिनयाच्या दुनियेत पुन्हा परतणार आहे. पठाण (Pathan) या चित्रपटातून शाहरुख पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत …

Read More »

आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी …

Read More »

आई-बहिणीच्या बाजूला बसलेला ‘हा’ चिमुरडा कोण आहे? ओळखलात का?

Viral photo : फोटोत आईबरोबर बसलेली ही दोन गोंडस मुलं बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे आहेत. भाऊ एक अभिनेता बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आहे आणि बहीण एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अलीकडेच, फोटोमध्ये दिसणार्‍या या बॉलिवूड स्टारने आपल्या मैत्रिणीबरोबर दुसरं लग्न केलं आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 19 फेब्रुवारीला दुपारी या अभिनेत्याने आपल्या प्रेयसीला आपली वधू बनवले आहे. या अभिनेत्याने आपले लग्न खंडाळ्यातील …

Read More »

Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Farhan-Shibani Wedding : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) वयाच्या 48व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. अभिनेत्री आणि होस्ट शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) त्याने लग्नगाठ बांधली आहे. शिबानी-फरहान दोघेही आता पती-पत्नी बनले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंब आणि काही निवडक पाहुण्यांसमोर दोघांनीही त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात केली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले …

Read More »

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘या’ नव्या विक्रमाला गवसणी!

Pushpa The Rise : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, असे असूनही चित्रपटाची जादू अद्याप कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडत आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने …

Read More »

कधी काळी रस्त्यावर चहा अन् लॉटरी तिकीट विकायचे अन्नू कपूर, ‘अंताक्षरी’ने अभिनेत्याला दिली खरी ओ

Annu Kapoor Birthday : आयुष्यातील सर्व अडचणींमध्येही जी व्यक्ती आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवते, हरत नाही, तीच व्यक्ती नेहमी यशस्वी होते. अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) याचे उत्तम उदाहरण आहेत. 20 फेब्रुवारी 1965 रोजी भोपाळमध्ये जन्मलेले अन्नू कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता गायक, रेडिओ जॉकी, टीव्ही होस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात भरपूर काम केले आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अन्नू …

Read More »

‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जो

Prabhas-Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत. बच्चन साहेबांची सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल …

Read More »

Jiah Khan Birth Anniversary : प्रेमात मिळाला मोठा धोका, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जिया खाननं

Jiah Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा (Jiah Khan) जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये अली रिझवी खान आणि राबिया अमीन यांच्या घरी झाला होता. तिचे खरे नाव नफिसा रिझवी खान होते. जिया खान अवघ्या दोन वर्षांची असताना तिचे वडील घर सोडून गेले. जिया जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हा ती ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात …

Read More »

Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन

Farhan Shibani Wedding : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्यात फरहानचे वडील म्हणजेच जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कविता वाचन केले आहे. जावेत अख्तरांनी या प्रसंगासाठी खास कविता रचली होती.  फरहान आणि  शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर आज दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल …

Read More »

Anushka Sharma : क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ (chakda xpress) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात अनुष्का भारतीय क्रिकेट महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. आता झुलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का सज्ज झाली आहे.  क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी अनुष्का शर्मा सज्ज झालेली आहे. या झूलन …

Read More »

Anushka Sharma : अनुष्का शर्माने शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ, म्हणाली…

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला काही लोक वेडा म्हणत होते. परंतु, हा व्हिडीओ शेअर करत अनुष्का शर्मा म्हणाली की, ‘वेडे लोक आहेत, ज्यांना माणुसकी दिसत नाही’. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जखमी कुत्र्याबद्दल प्रेम व्यक्त आहे. तो त्या जखमी कुत्र्याला …

Read More »

Sonalee Kulkarni : ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ने दिली शिवरायांना मानवंदना

Sonalee Kulkarni : शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी शिवरायांना वंदन केलं जात आहे. सोशल मीडियावरुनदेखील शिवरायांना मानवंदना दिली जात आहे. मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील (Sonalee Kulkarni) सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना दिली आहे.  सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती पारंपारिक पेहरावात दिसत आहे. तसेच तिच्या मागे छत्रपती शिवरायांची एक सुरेश मूर्तीदेखील दिसत आहे. सोनालीने फोटो शेअर करत शिवरायांना …

Read More »

Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

Toolsidas Junior Trailer : ‘तुलसीदास ज्युनियर’ (Toolsidas Junior) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिवंगत राजीव कपूर (Rajiv Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव प्रमुख भूमिकेत आहेत.  टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवरून सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शनच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, …

Read More »

Gangubai Kathiawadi : इमान..धर्म…धंदा.. रहिमलाला येतोय, अजय देवगणच्या पात्राची पहिली झलक

Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) प्रमुख भूमिकेत आहेत. Koo App ’GANGUBAI KATHIAWADI’: AJAY DEVGN AS RAHIM LALA… #RahimLala – the character portrayed by #AjayDevgn – in #GangubaiKathiawadi… …

Read More »

Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत

Farhan Akhtar and Shibani Dandekar Wedding Photo : फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि  शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघांनीही त्यांचे नाते एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी खास पद्धतीने लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटोदेखील समोर आला आहे.  लग्नसोहळ्यातील फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. …

Read More »