Shah Rukh Khan : किंग खानला सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये पाहून चाहते घायाळ, केली ‘ही’ कमेंट

Shah Rukh Khan new look : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये झिरो (Zero) या चित्रपटात दिसला होता. दिर्घ काळानंतर शाहरुख आता अभिनयाच्या दुनियेत पुन्हा परतणार आहे. पठाण (Pathan) या चित्रपटातून शाहरुख पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. शाहरुखच्या या लूकवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.

शाहरुख खानच्या नवीन लूकचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो सॉल्ट आणि पेपर लूकमध्ये दिसत आहे. लांब केस, फॉर्मल सूट त्याने परिधान केला आहे. पांढऱ्या दाढीत शाहरुखच्या चेहऱ्यावर हलके हसू आहे. असा हा एकंदर लूक आहे. 

 


या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव :

शाहरुख खानचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, मी शाहरुख खानवरून नजर हटवत नाही आहे. दुसरीकडे, आणखी एका चाहत्याने लिहिले – प्ले अलेक्सा – इन्ना सोना तेनु रब ने बनाया. 

हेही वाचा :  'थँक्यू पण हे...'; पठाणला ट्रोल करत अॅक्शन हिरोचं कौतुक करणाऱ्याला आयुष्मानचा रिप्लाय

आगामी पठाण चित्तरपटाव्यतिरिक्त बोलायचे जाले तर, पठाण व्यतिरिक्त शाहरुख अॅटलीच्या चित्रपटात नयनताराबरोबर दिसणार आहे. पुढील आठवड्यापासून तो या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखबरोबर अॅटलीच्या चित्रपटात सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर हे देखील दिसणार आहेत. अॅटलीच्या चित्रपटाच्या प्रमोशननंतर पठाणचे शूट पूर्ण करण्यासाठी तो दीपिका आणि जॉनबरोबर स्पेनला रवाना होणार आहे. स्पेनहून परतल्यानंतर तो अॅटलीच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग करणार आहे.
 
महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Digambar Naik : दिगंबर नाईकचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) …

‘या’ आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक …