Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘या’ नव्या विक्रमाला गवसणी!

Pushpa The Rise : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, असे असूनही चित्रपटाची जादू अद्याप कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडत आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने 9 आठवड्यातही तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे.

या बक्कळ कमाईसह, ‘पुष्पा’ हा चित्रपट 9व्या आठवड्यात इतकी कमाई करणारा देशातील दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी, विकी कौशलचा चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ 1.64 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर होता. दरम्यान, ‘पुष्पा’नेही या यादीत आपले दुसरे स्थान निश्चित केले आहे.

चित्रपटाच्या या कलेक्शनबद्दलही सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे, कारण चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही थिएटरमध्ये ही कामगिरी केली आहे. मात्र, मंदगतीने सुरू झालेला ‘पुष्पा’चा या आठवड्यातील व्यवसाय येत्या आठवडाभरात आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने कमी कालावधीत अनेक विक्रम केले आहेत. बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने आधीच जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी आता चित्रपटगृहांनंतर OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

हेही वाचा :  बर्थ-डे सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

‘पुष्पा’ चित्रपटाबद्दल सांगायचे, तर अल्लू अर्जुनचा हा ब्लॉकस्टर चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना आणि फहाद फासिलदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Digambar Naik : दिगंबर नाईकचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) …

‘या’ आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक …