Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या चर्चेत आहे. अशातच कंगनाने पुन्हा एकदा आलिया भट्ट आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर निशाणा साधला आहे. कंगना आलियाला ‘बिंबो’ आणि ‘पापा की परी’ म्हणाली आहे.
कंगनाने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली, “संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील कास्टिंग चुकीचे आहे. येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपये राख होणार आहेत”. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये थेट आलियाचे नाव घेतले नसले तरी तिची पोस्ट वाचल्यानंतर ती कोणाचे नाव घेत आहे हे स्पष्ट होते.
कंगना रनौतने आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणवर अनेकदा निशाणा साधला आहे. दीपिकाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘Gehraiyaan’ या चित्रपटाची खिल्ली उडवत कंगनाने लिहिले होते की, चित्रपटाच्या नावावर कचरा देऊ नका. कंगना सध्या ‘लॉक अप’ रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाची कथा काय आहे?
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात ‘गंगूबाई’ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi : आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी
The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित
Pawankhind : ‘पावनखिंड’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड, ‘हा’ विक्रम रचणारा पहिला मराठी चित्रपट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha