Tag Archives: mumbai news

निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश; मुंबई पालिकेचा प्रभाग पुनर्रचना आराखडा

मुंबई पालिकेचा प्रभाग पुनर्रचना आराखडा मुंबई : पालिकेची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने आधी प्रभाग पुनर्रचनेच्या आराखडय़ाबाबत अधिसूचना काढणे अनिवार्य आहे. असे असले तरी करोनामुळे निर्माण झालेल्या विशेष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेतील प्रभाग पुनर्रचनेसाठी या अटीत सवलत द्यायला हवी, असे तोंडी मत उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. त्याच वेळी या अधिसूचनेविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर राज्य निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने …

Read More »

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत …

Read More »

परीक्षार्थीची छायाचित्रे, परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी; तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय

|| मंगल हनवते तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय मुंबई : तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे.  या तपासणीत दोषी आढळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात निवड झालेला उमेदवार असल्यास त्याची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.   म्हाडाची भरती परीक्षा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात …

Read More »

अडीच लाख म्हाडा परीक्षार्थी; शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत

शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेतील सर्व परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, भरती परीक्षा पार पडल्या तरीही अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा आहे.  पुणे सायबर पोलिसांनी पेपरफुटीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही करण्यात आली. सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेतली, पण …

Read More »

एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा

|| सुशांत मोरे बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास करता येणार आह़े  सुलभ प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आह़े प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आह़े  बेस्ट उपक्रमाने २०२० च्या …

Read More »

एसटीत आता कंत्राटी वाहकांची भरती; ‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया

‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया मुंबई : कामगारांच्या संपामुळे एसटीची सेवा अद्यापही पूर्ववत होऊ न शकल्याने महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. मात्र, संपात मोठय़ा प्रमाणात वाहकही सहभागी असल्याने महामंडळाने काही महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीत ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, २७ हजार ९८५ कर्मचारी  कामावर हजर झाले आहेत. अद्यापही …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढेल – संजय राऊत

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकार स्थापन करतील, असंही राऊत म्हणाले. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर, २०२४मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच …

Read More »

‘हिजाब’चे राज्यभर धर्मातीत समर्थन; विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह

विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह मुंबई : कर्नाटकमधील महाविद्यालयांत हिजाबवर बंदी घालण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद देशभर उमटत असताना राज्यात मात्र थोडे वेगळे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांनी अशा प्रकारे धर्माला लक्ष्य करणारा पोशाखविरोध केल्यास आम्ही देखील हिजाब वापरू, अशी भूमिका घेत तुरळक स्वरूपात हिंदूू मुली मुस्लिम विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ उभ्या राहत आहेत. तर विरोधामुळे केवळ शैक्षणिक स्तरावरच नाही तर …

Read More »

दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट; उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजारांवर

उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजारांवर मुंबई: राज्यात दैनंदिन करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊन सुमारे ५२ हजार झाली आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली. जानेवारीमध्ये दैनंदिन सुमारे ३३ हजार ५१० रुग्ण आढळत होते, तर फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण ११ हजार ८९२ रुग्ण आढळले आहेत. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या …

Read More »

वानखेडेंच्या तक्रारीबाबत गुन्हा दाखल करण्याची शिफारस; मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे  तक्रार

मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे  तक्रार  मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस राष्ट्रीय आयोगाने केली आहे. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे अथवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबाबतही पोलिसांना आयोगाकडून सांगण्यात आले. आर्यन खानला अमली पदार्थाप्रकरणी …

Read More »

आदिवासींच्या विकासासाठी निधीची कमतरता; मंत्र्यांचीच खंत

मंत्र्यांचीच खंत मुंबई : राज्यातील आदिवासी समाजासाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो, त्यात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मोठा भार असतो, परिणामी या समाजाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही, अशी खंत खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी यशवंतराव प्रतिष्ठान येथे आदिवासी समाजाचे नेते …

Read More »

क्षयरोगबाधित बालकांमध्ये ४४ टक्के वाढ

|| शैलजा तिवले मुंबई : मुंबईत चार वर्षांमध्ये बालकांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाढले आहे. यात औषधांना दाद देणाऱ्या क्षयरोगासह (डीएस टीबी) औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे (ड्रग रेझिस्टंट- डीआर) प्रमाणही वाढत आहे. मागील चार वर्षांत हे प्रमाण सुमारे ४४ टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. घरामध्ये कोणाला क्षयरोग झाल्यास बालकांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. त्यात एचआयव्हीबाधित, कुपोषित …

Read More »

राज्यात जानेवारीत ७ हजार बेरोजगारांना नोकऱ्या; ९४ हजार उद्योगांची मनुष्यबळासाठी मागणी

९४ हजार उद्योगांची मनुष्यबळासाठी मागणी मुंबई : करोनाच्या संकटामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील खासगी, सार्वजनिक अशा जवळपास ९४ हजार उद्योगांनी मनुष्यबळ मागणीसाठी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजगता विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यातून चालू वर्षांच्या प्रारंभालाच म्हणजे जानेवारी महिन्यात सात हजारांहून अधिक बेरोजगारांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने महास्वयंम …

Read More »

वधू-वर सूचक संकेतस्थळावरून ४५ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून दोघांना अटक

सायबर पोलिसांकडून दोघांना अटक मुंबई:  मराठी वधू-वर सूचक संकेतस्थळावरून महिलेशी संपर्क साधून तिची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अँटॉपहिल परिसरातून दोघांना अटक केली. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. अझर अन्सारी(२२) व राजकुमार पांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही अँटॉपहिल परिसरातील रहिवासी आहेत. लुबाडलेली रक्कम जमा करण्यासाठी आरोपींनी बँक खाते उपलब्ध करून दिल्याचा आरोप …

Read More »

मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

अजित पवार यांचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रिमंडळात मुखपट्टीपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत मुखपट्टी लावावीच लागेल. ज्यावेळी मुखपट्टी काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही  सांगू. तोपर्यंत मुखपट्टी लावायची म्हणजे लावायचीच, असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी, वरळी कोळीवाडा, माहीम रेतीबंदर, महालक्ष्मी, …

Read More »

भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं बाहेर येत असल्याने संजय राऊतांची आदळआपट सुरू – शेलार

संजय राऊतांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता आज तयार नाही, असंही शेलार यांनी बोलून दाखवलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “भ्रष्टाचाराची सगळी प्रकरण बाहेर येत असल्याने संजय राऊत यांची आदळआपट सुरू आहे. संजय राऊत आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता तयार नाही.” असं शेलार …

Read More »

“विरोधीपक्षात असताना आम्ही रोज राजभवनावर येत नव्हतो”; नव्या दरबार हॉलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा टोला

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील विरोधकांच्या उपस्थितीवरुन टोला लगावला.  “मला आज नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन …

Read More »

लोकल प्रवासात आजपासून मोफत करमणूक

मुंबई : लोकल प्रवासात प्रवाशांची करमणूक होण्यासाठी मध्य रेल्वे आणि एका खासगी कंपनीमार्फत कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत वायफाय, मोबाइल अ‍ॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार असून यात विविध करमणूक उपलब्ध असेल. हे वायफाय प्रवाशांना प्रवासात अमर्यादित वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या सुविधेचा शुभांरभ शुक्रवारपासून मध्य रेल्वेवर करण्यात येणार आहे. या सेवेमुळे प्रवासादरम्यान आपल्या …

Read More »

शिवाजी पार्कमधील स्मारकावरून वाद, मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राजकारणी लोकांनी…”

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलंय. “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही,” असं स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केलं. तसेच राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असं आवाहनही केलं. …

Read More »

लेखिकेला समाज माध्यमांवरून बलात्कार, हत्येची धमकी ; भोपाळवरून तरूणाला अटक

या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते. पत्रकार व लेखिका असलेल्या महिलेची समाज माध्यमांवर बदनामी करून तिला बलात्कार व हत्येची धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी २४ वर्षीय तरूणाला भोपाळवरून अटक केली. या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते. याप्रकरणी चार ट्वीटर व दोन इन्स्टाग्राम खाते धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. …

Read More »