Tag Archives: mumbai news

तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले

डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत, संजय राऊतांची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेताना देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरु असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप …

Read More »

“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

महिन्याभरात पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, संजय राऊतांची माहिती शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले असून चौकशी सुरु आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्राप्तिकर विभागाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत …

Read More »

नवाब मलिकांना आणखी एक धक्का; ईडीकडून कप्तान मलिक यांना समन्स जारी

मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली आहे.  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. त्यानंतर आता नवाब मलिक यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स …

Read More »

नवाब मलिकांवरील कारवाईवरुन महाविकास आघाडी आक्रमक; मंत्रालयाजवळ आंदोलनाला सुरूवात

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी …

Read More »

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर… आधी दाऊदच्या भावाला अटक…दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक …

Read More »

नवाब मलिक यांना अटक ; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ची कारवाई, ३ मार्चपर्यंत कोठडी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली़ दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात …

Read More »

ED Arrests Nawab Malik : फडणवीसांवर केलेले आरोप मलिकांना भोवले

मुंबई : समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांची पत्नी अमृता यांना वादात ओढण्याचा केलेला प्रयत्न मलिकांना त्रासदायक ठरला आहे. नवाब मलिक यांच्या जावयाला गेल्या वर्षी अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक झाली होती. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला झालेल्या अटकेनंतर मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. या …

Read More »

महाविकास आघाडी संघर्षांच्या पवित्र्यात ; नवाब मलिक यांना अभय, आज मंत्र्यांचे धरणे

मुंबई :  अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केला. अटक झाली तरी मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. तसेच  गुरुवारी महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने …

Read More »

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक तुरुंगात

मुंबई: छगन भुजबळ, अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक या पहिल्या फळीतील नेतेमंडळींच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विविध नेत्यांवर होणारे आरोप किंवा नेतेमंडळींच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्याचे परिणामही राष्ट्रवादीला भोगावे लागले आहेत. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. खंडणीच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुंरुगात आहेत. या यादीत …

Read More »

सर्वानाच लोकल प्रवासासाठी रेल्वेची सज्जता ; राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा

मुंबई : सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. यात सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता अससल्याने मध्य व पश्चिम रेल्वेही सज्ज राहिली आहे. यात सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्याबरोबरच  एटीव्हीएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर १७८ एटीव्हीएम सुरू करण्यात आली असून रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवा दिली जात …

Read More »

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण स्पष्ट नाही

अग्निरोधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा; चौकशी अहवालातील निष्कर्ष मुंबई :  ग्रॅन्टरोड येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल एक महिन्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला असून आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अज्ञात असल्याचे यात म्हटले आहे. अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबाबत इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही या अहवालात प्रस्तावित …

Read More »

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर …

Read More »

नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही लढाई…”

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर …

Read More »

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिकांनंतर आता पुढचा नंबर…”

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक …

Read More »

ED च्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी BJP ची उमेदवारी; रोहित पवार म्हणतात, “आम्ही सांगेल ती कामं…”

ईडीचे सहनिर्देशक राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब …

Read More »

“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी…”; अमोल कोल्हेंनी कविता शेअर करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

या कवितेतून अमोल कोल्हेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची …

Read More »

“संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

“याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली.” अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधलाय. उपहासात्मक टीका करताना नितेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांचे आभार मानलेत. “एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरी …

Read More »

“२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत” ; ‘ईडी’च्या कारवायांवर संजय राऊतांच विधान!

नवाब मलिक यांना ईडीचे पथक चौकशीसाठी पहाटेच घेऊन गेलेलं आहे, यावर संजय राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. …

Read More »

“शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”, सुप्रिया सुळेंकडून ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. …

Read More »

“मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात, कधीकाळी टीका-आरोप झाले, पण…”, शरद पवार यांचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं. तसेच आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही, असंही शरद पवार …

Read More »