Tag Archives: mumbai news

नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आमदार नितेश राणेही याप्रकरणी सहआरोपी आहेत. लवकरच पोलीस दोघांचा जबाब नोंदवणार आहेत.  दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी  दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले …

Read More »

‘माय मराठी प्रकल्प’ स्तुत्य उपक्रम : सुभाष देसाई

मुंबई : अमराठी भाषिकांना मराठी शिकता यावे, मराठी भाषेचे दरवाजे सर्वासाठी खुले व्हावेत यासाठीचा मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या वतीने २०१२ मध्ये सुरू करण्यात आलेला ‘माय मराठी प्रकल्प’ अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. शासकीय धोरण राबविण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी भरीव कामगीरी या प्रकल्पाने केली असल्याचे गौरवोद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था …

Read More »

रेल्वेलगत असलेल्या झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी शासन अनुकूल ; प्रस्ताव पाठविण्याची रेल्वेला सूचना

मुंबई : झोपडीवासीयांच्या बाजूने शासन असून, रेल्वेलगतच्या झोपडय़ांचे पुनर्वसन करावयाचे असल्यास राज्य शासनाच्या झोपडपट्टी पुनर्विकासाबाबतच्या धोरणानुसार करता येईल. मात्र तसा प्रस्ताव रेल्वेने केंद्राला पाठवावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत केली. राज्य शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवावा. झोपडपट्टी पुनर्विकासाला १९९५ पासून सुरूवात झाली. २०१८ च्या शासन निर्णयानुसार, २०११ पर्यंतच्या झोपडय़ा …

Read More »

वीज बिघाडामुळे उपनगरीय लोकल ठप्प ; २०० फेऱ्या विस्कळीत

मुंबई : वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड ट्रॉम्बे येथील वीज वाहिनीत बिघाड झाला आणि टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडले. जवळपास एक तासांहून अधिक वेळ खंडीत झालेल्या वीज पुरवठय़ामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले. यामुळे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणाच बंद पडल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील २०० हून अधिक लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. सकाळी पावणे दहाच्या सुमारास विद्युत पुरवठय़ात …

Read More »

मुंबईत सव्वातास वीजपुरवठा खंडित ; पारेषण यंत्रणा, टाटा पॉवरचे वीजसंच बंद झाल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड-ट्रॉम्बे या २२० केव्ही वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडल्याने एकूण ९७६ मेगावॉटचे भारनियमन होऊन दक्षिण मुंबईसह चेंबूर व आसपासच्या परिसरात रविवारी सकाळी पावणेदहा ते अकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लोकलसेवा बंद पडण्यासह जनजीवन विस्कळीत झाल़े पारेषण वाहिन्यांतील बिघाड व टाटा पॉवरचे वीजसंच बंद पडण्याआधी मुंबईत २०८३ …

Read More »

पवार कुटुंबाच्या प्रभावामुळेच ‘लवासा’ पूर्ण !; विरोधातील याचिका फेटाळली

विरोधातील याचिका फेटाळली मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावामुळेच मुळशी तालुक्यातील लवासा हे ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले. मात्र प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत आणि प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खूपच विलंब झाला आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला. खासगी ‘हिल स्टेशन’ म्हणून लवासा …

Read More »

मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला?; दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार

दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार मुंबई : पुढील मराठी भाषादिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा दरवर्षी मराठी भाषादिनी राज्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असली तरी मराठी भाषेला दर्जा मिळण्यात गुजराती भाषेचा अडसर ठरत असल्यानेच केंद्राकडून हात आखडता घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भाषांची ही कटकट लक्षात घेता अभिजात भाषेच्या दर्जाची प्रक्रियाच मोडीत काढण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू …

Read More »

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…”

राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण अतिशय गांभीर्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यात आले होते. यासाठी राज्याच्या विधानसभेत चर्चादेखील करण्यात आली. या चर्चेमध्ये गृहविभागाने आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला …

Read More »

“राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कालपासूनच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा …

Read More »

भाजपचे राजकारण देश आणि लोकशाहीसाठी हानिकारक; ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात वर्षवेध या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत मुंबई : केंद्रात सत्ता आहे म्हणजे राज्यांची मुस्कटदाबी करत त्यांना बदनाम करायचे, हे सत्तापिपासूपणाचे आणि पातळी सोडलेले राजकारण असून ते देश आणि लोकशाहीला हानिकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गांजाची शेतीच होते आणि तो देशातील सर्वात सडका …

Read More »

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता’चा वर्धापन दिन रंगला!

मुंबई : करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित ‘लोकसत्ता’च्या ७४ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रंगला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘लोकसत्ता’चे अमृतमहोत्सवी वर्षांतील पदार्पण हा योग साधून निवडक राष्ट्रीय नेत्यांचे स्वातंत्र्याविषयीचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधीही उपस्थितांना मिळाली. करोना संसर्गाचे भय काहीसे कमी झाले असले तरी शासकीय नियम पाळून ‘लोकसत्ता’चा ७४ वा …

Read More »

यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापा; मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम

मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या निवासस्थानी संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी करीत होते. या प्रकरणी मुंबईत ३३ ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून महाविकास आघाडीतील मंत्र्याच्या चौकशीचे सत्र सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून …

Read More »

मुंबईतील सर्व शाळा २ मार्चपासून पूर्ण क्षमतेने

मुंबई : मुंबईतील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या २ मार्चपासून पूर्णवेळ व पूर्ण क्षमतेने प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मुंबईतील करोनाचा कमी झालेला प्रभाव आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजूरी …

Read More »

“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधालाय. सोमय्या यांनी ‘डर्टी १२’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील काही दिवसांपासून अनेकदा वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गोटेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. …

Read More »

‘नाय वरन-भात लोन्चा…’: महेश मांजरेकांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माहिम पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तो रद्द व्हावा यासाठी महेश मांजरेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. महेश मांजरेकांना अटकेपासून कोणताही …

Read More »

या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू असं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात – आशिष शेलार

“भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद यांच्या समर्थनार्थ सरकार पूर्णवेळ काम करतय”, असा आरोपही शेलार यांनी केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपाची कोअर कमिटीची बैठकीहोत आहे. या बैठकीरच्या अगोदर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, माध्यमांना बैठकीबाबत माहिती देखील दिली. पत्रकार परिषदेस भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील उपस्थित होते. या …

Read More »

तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले

डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत, संजय राऊतांची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेताना देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरु असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप …

Read More »

“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

महिन्याभरात पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, संजय राऊतांची माहिती शिवसेने नेते आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले असून चौकशी सुरु आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्राप्तिकर विभागाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत …

Read More »

नवाब मलिकांना आणखी एक धक्का; ईडीकडून कप्तान मलिक यांना समन्स जारी

मनी लॉन्डिरग प्रकरणी ईडीने नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली आहे.  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली. त्यानंतर आता नवाब मलिक यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स …

Read More »

नवाब मलिकांवरील कारवाईवरुन महाविकास आघाडी आक्रमक; मंत्रालयाजवळ आंदोलनाला सुरूवात

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक केली़  न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी …

Read More »