संजय राऊतांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता आज तयार नाही, असंही शेलार यांनी बोलून दाखवलं आहे.
भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “भ्रष्टाचाराची सगळी प्रकरण बाहेर येत असल्याने संजय राऊत यांची आदळआपट सुरू आहे. संजय राऊत आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता तयार नाही.” असं शेलार यांनी बोलून दाखवलं.
भाजपाच्या पत्रकारपरिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “आज ज्यावेळी तुमची सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येण्याच्या दिशेने आहेत. त्यावेळी तुमची आदळआपट, तडफड, थयथयाट होत आहे आणि राजकारणातलं दुर्दैव काय आहे बघा, महाविकास आघाडीतील लोकाना कळालं पाहिजे म्हणून मी दुर्दैव हा शब्द वापरतोय. ज्या संजय राऊतांनी आगपाखड सगळी एकत्र करून, या नवीन महाविकास आघाडीच्या जन्मासाठी प्रयत्न केले. ते आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने कोणी वक्तव्य करायला तयार नाही. त्यांच्या समर्थानार्थ शिवसेनेचा एकही नेता बोलायला तयार नाही. एवढच नाही तर ज्या राष्ट्रवादीच्या गोदीत ते जाऊन बसले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते किंवा अन्य कोणी नेते जाहीरपणे त्यांची बाजू मांडायला तयार नाहीत. आणि परिस्थिती संजय राऊत यांची आली, की आज एकदा नाही किमान तीनदा त्यांना हे बोलावलं लागलं, एकदा लिहून, दोनदा स्वत: म्हणून सत्तेत बसलेले काय करत आहेत बोला. मंत्रीपदावर बसलेल्यांनी बोललं पाहीजे आणि लिहून त्यांनी लेखाद्वारे म्हटलं मुंबईतील, राज्यातील पोलीस यंत्रणा काही करत नाही का? दुर्दैवाने ते एकटे पडले आहेत. एकलकोंडे झाले आहेत, मला त्यांची आता चिंता वाटायला लागली आहे. अशी परिस्थिती राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून संजय राऊत यांची केलेली आहे.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या
