मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण


अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई : मंत्रिमंडळात मुखपट्टीपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत मुखपट्टी लावावीच लागेल. ज्यावेळी मुखपट्टी काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही  सांगू. तोपर्यंत मुखपट्टी लावायची म्हणजे लावायचीच, असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी, वरळी कोळीवाडा, माहीम रेतीबंदर, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरे यांनी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले. आदित्य ठाकरेंसह दौरा केला आणि त्यांनी गाडीचे सारथ्य केले याचा अर्थ मुंबई महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादीची युती झाली असा होत नाही. युतीबद्दल दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीबद्दल माध्यमांनी विचारले असता प्रत्येकाला गाडी चालवण्याची आवड असते. मुख्यमंत्रीही अनेकदा ‘मातोश्री’वरून ‘वर्षां’वर येताना गाडी चालवतात. आदित्य ठाकरे यांनी गाडी चालवली म्हणून असे अंदाज बांधण्याची गरज नाही. आमचे तीन पक्षांचे सरकार असून काही मित्रपक्षांनीही पाठिंबा दिला आहे. जिथे चांगलं चाललं आहे ते पाहून आपल्या भागातही राबवावं असा प्रयत्न आहे. मुंबई चांगली दिसावी तसेच मुंबईत खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांचा आहे. सर्वानी एकत्र काम करण्याचे ठरले आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचाही अधिकार आहे. निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यासंबंधी सध्या चर्चा करण्याचे काही कारण नाही, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

हेही वाचा :  रायगडमधील दरड कोसळलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर

मला ही विकासकामे पहायची होती. काही लोक मुद्दाम जातात, पाहणी करतात. मग असे बोट करा सांगत फोटो काढले जातात. आम्हाला अशी नौटंकी करायची नव्हती. आमचा त्यासंबंधी कोणताही विचार नव्हता. चांगल्या कामाला जास्त काही मदत हवी तर केली पाहिजे या मताचे आम्ही असल्याने ही पाहणी केली, असे पवार म्हणाल़े

The post मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …