Tag Archives: Education News in Marathi

Talathi Bharti: राज्यात तलाठी पदांची बंपर भरती; पात्रता, पगार सर्वकाही जाणून घ्या

Talathi Recruitment: तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाकडून तलाठी भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जाणार आहे. यानुसार महसूल विभाग अंतर्गत तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात …

Read More »

मराठा उमेदवारांचा पुन्हा भ्रमनिरास, आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमराठा आरक्षणासाठीच्या राखीव जागांवरून परीक्षा दिलेल्या व त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) कोट्यातून नियुक्तीपत्रे मिळणार असलेल्या उमेदवारांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. य़ा उमेदवारांना आर्थिक दुर्बल कोट्यातून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांसह मराठा ठोक मोर्चाच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर गुरुवारी सायंकाळी आंदोलन केले. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकारने …

Read More »

MHT CET: सीईटींची संख्या कमी नाहीच

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’सोबतच विविध सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. या सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर केल्यामुळे, यंदाही सीईटींची संख्या कमी होणार नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक परीक्षा’ (वन नेशन वन एक्झाम) या धोरणाला राज्यात पुन्हा एकदा केराची टोपली दाखवण्यात आली …

Read More »

ITI Exam: आयटीआय पुरवणी परीक्षा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा लांबणीवर पडली आहे. २०१४पासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून परीक्षा घेण्यात येत आहे. आठ वर्षांत बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा नियोजनात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे २०१४ ते २०२१ या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था …

Read More »

Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारा, ‘येथे’ करा नोंदणी

Pariksha Pe Charcha 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलू इच्छिणारे, त्यांना प्रश्न विचारु इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट mygov.in वर ३० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. शिक्षण मंत्रालयाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे सहभागी झालेले …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्काराचा पालिकेला विसर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेच्या प्रशासनाला आदर्श शिक्षक पुरस्काराचा विसर पडल्याचे चित्र आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याकडे ठोस उत्तर नाही. हे दोन्हीही अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्यामुळे आदर्श शिक्षकांना पुरस्कार मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरस्कार रखडल्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची पद्धत बंद पडली आहे. ती …

Read More »

MPSC Exam: सरकारी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांकडून ‘ऑप्टिंग आउट’चा गैरफायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणेसरकारी विभागात पदे रिक्त राहू नयेत, प्रतीक्षायादीतील उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘ऑप्टिंग आउट’ या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, सरकारी पदांवर निवड झालेले उमेदवार या निर्णयाचा गैरफायदा घेत आहेत. हे उमेदवार परीक्षेद्वारे मिळालेले सरकारी पद सोडण्यासाठी, प्रतीक्षायादीत अग्रक्रमावर असलेल्या उमेदवारांकडून पाच ते १० लाख रुपयांची मागणी करत आहेत. ‘एमपीएससी’कडून पदभरतीच्या अनेक परीक्षा घेतल्या जातात. …

Read More »

कंडक्टरची मुलगी झाली राज्य करनिरीक्षक, आई देवाघरी गेली पण लेकीनं शब्द खरा करुन दाखवला

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या गट ‘ब’ मुख्य सेवा परीक्षेचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील एसटी कंडक्टर सुनील पोलशेट्टीवार यांची मुलगी हर्षल हिने यश संपादन केले. राज्य करनिरीक्षक सोबतच मंत्रालयातील कक्ष अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केल्याने महामंडळाचे कर्मचारी आणि गडचिरोलीकरांकडून तिने कौतुकाची …

Read More »

Police Recruitment: पोलीस भरतीचे अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

म. टा. प्रतिनिधी, बीडमहाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पोलिस …

Read More »

प्राध्यापक भरती, रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर भर देणार; विद्यापीठ विकास मंचाचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नगर आणि नाशिक उपकेंद्रांचे सक्षमीकरण, नवे अभ्यासक्रम, प्राध्यापक भरती अशा प्रमुख मुद्द्यांवर विद्यापीठ विकास मंच अधिसभेच्या (सिनेट) कार्यकाळात काम करणार आहे,’ अशी माहिती विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांनी गुरुवारी दिली. ‘राज्य सरकारकडे थकीत असलेली शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे …

Read More »

Google Girl: इयत्ता तिसरी पण मुलीला पीएचडी करणाऱ्यांइतकी माहिती, गुगलला देतेय टक्कर

Google Girl: मुलगी शिकली आणि प्रगती झाली असं म्हणतात. यूपीच्या गोंडा कोतवाली ग्रामीण भागातील सालपूर मार्केटमध्ये राहणाऱ्या रामधन तिवारीची ८ वर्षांची मुलगी रियाने आपल्या आईवडिलांसोबत राज्याचे नावही रोशन केले आहे. रियाला जगातील खंड, महासागरांची नावे, जगभरातील देश, त्यांच्या राजधानी आणि चलने, भारताची राज्ये आणि राजधान्या तोंडी आठवतात. रियाला भारतातील सर्व जिल्हे, भारतातील सर्व प्रमुख बंदरे, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, भारतात वाहणाऱ्या …

Read More »

महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या ‘केरळ पॅटर्न’विषयी तज्ञांमध्ये मतभिन्नता

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यात शिक्षण क्षेत्रात तिसरी ते आठवीसाठी केरळ पॅटर्न राबविणार असल्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. यावर तज्ज्ञांनी मतभिन्नता व्यक्त केली आहे. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी या निर्णयात नवे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या परीक्षा केवळ घोकमपट्टीपुरत्या मर्यादित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘राज्यात …

Read More »

तब्बल ६२६ स्कूलबस, व्हॅन ‘अनफिट’; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नागपूर : विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या शहरातील तब्बल ६२६ स्कूलबस व स्कूलव्हॅन ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही ही वाहने शहरातील रस्त्यांवर सर्रासपणे धावत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. धोकादायक असलेल्या या वाहनांकडे आरटीओचे दुर्लक्ष कसे, याचा ‘अर्थ’ मात्र कोणालाही कळालेला नाही.-कोराडी पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसाळा परिसरात स्कूलबसने आठवीत शिकणारा विद्यार्थी सम्यंक दिनेश …

Read More »

गणवेश दिरंगाईनंतर पालिकेच्या विद्यार्थ्यांना आता पोषण आहाराची चिंता

म. टा. वृत्तसेवा, कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांपेक्षा खासगी शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढल्याने पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे. विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट शिक्षकांनी यंदाच्या वर्षी काही प्रमाणात गाठले असले तरी पालिका प्रशासन मात्र शिक्षणाच्या बाबतीत उदास असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर मंगळवारी अखेर गणवेशवाटप सुरू झाले असले तरी पोषण आहार लालफितीतच अडकला आहे. मधल्या सुट्टीत …

Read More »

राज्यात लवकरच वैद्यकीय सेवा प्राधिकरण

Medical Services Authority: उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल झालेल्या एका याचिकेच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकत्रित खरेदी केल्यास कमीत कमी दर मिळावा म्हणून २६ जुलै २०१७च्या शासन निर्णयानुसार हाफकिन जीव औषध महामंडळाच्या अंतर्गत खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आणि राज्यातील औषधे व उपकरणांची सर्व विभागांची खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिनकडे सोपवण्यात आली होती.   राज्यात लवकरच वैद्यकीय सेवा प्राधिकरण …

Read More »

HSC Exam: बारावी अर्जांसाठी अखेरचा आठवडा

म.टा.प्रतिनिधी, नागपूरयंदाच्या बारावी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आता एका आठवड्याची मुदत उरली आहे. नियमित शुल्कासह २५ नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज भरावयाचे होते. त्याकरिता …

Read More »

‘जेजे’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

म. टा. प्रतिनिधी, मुंबईजे. जे. कला महाविद्यालयातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांची सोमवारी भेट घेतली. मात्र त्यामध्ये ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. जे. जे. कला महाविद्यालयात कायमतत्त्वावर केवळ सात प्राध्यापक कार्यरत आहेत. कायम तत्त्वावरील प्राध्यपकांची पदे अनेक वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. …

Read More »

BARTI: अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना २ लाख देणारी बार्टीची योजना गेली कुठे?

म. टा. प्रतिनिधी, नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) २०२० साली दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी दोन लाख रुपये देणारी डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षे उलटली तरी ती कार्यान्वित झालेली नाही. बार्टीची योजना कुठे गेली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना मेडिकल …

Read More »

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणारी ‘ही’ सुविधा रद्द

म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनाकाळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेली ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३मध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही काढून टाकण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षा करोनापूर्वीच्या पद्धतीनुसार पार पडणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे …

Read More »

पदवीधर अधिसभेसाठी जिल्ह्यात १९ मतदान केंद्रे

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रविवारी (दि. २०) होणाऱ्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये १९ मतदान केंद्रे राहणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६ हजार २२२ मतदार असून, तीन पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत. विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ विकासमंच, छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल व महाविकास आघाडी अशा तीन पॅनलने आपापले उमेदवार उभे केले आहेत. दहा जागांसाठी केवळ विद्यापीठ …

Read More »