तब्बल ६२६ स्कूलबस, व्हॅन ‘अनफिट’; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नागपूर : विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या शहरातील तब्बल ६२६ स्कूलबस व स्कूलव्हॅन ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही ही वाहने शहरातील रस्त्यांवर सर्रासपणे धावत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. धोकादायक असलेल्या या वाहनांकडे आरटीओचे दुर्लक्ष कसे, याचा ‘अर्थ’ मात्र कोणालाही कळालेला नाही.

-कोराडी पोलिस स्टेशन हद्दीतील म्हसाळा परिसरात स्कूलबसने आठवीत शिकणारा विद्यार्थी सम्यंक दिनेश कळंबे (वय १३,रा. बाराखोली, इंदोरा) याला चिरडून ठार केले.

-मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारी आरटीओचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी तडकाफडकी शहरातील स्कूलबस व व्हॅनच्या दस्तऐवजांची तपासणी सुरू केली.

-या कारवाईमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या बळीनंतरच आरटीओला कारवाईची जाग येते का, असा संतप्त सवाल नागपूरकर करीत आहेत.

-शहरातील नागपूर पूर्व व शहर कार्यालयांत सध्यस्थितीत एकूण १८०३ स्कूलबस व स्कूल व्हॅनची नोंदणी करण्यात आली आहे. -त्यापैकी शहर कार्यालयात २५५ स्कूलबस व ४३२ स्कूलव्हॅन आहेत. १३९ बस व ३४७ व्हॅन विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात फिट आहेत.

-फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या बसची संख्या ११६ तर व्हॅनचा आकडा ८५ आहे.

हेही वाचा :  CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह

-पूर्व कार्यालयात ३०२ स्कूलबसची नोंद असून, २६८कडे प्रमाणपत्र तर ३४कडे फिटनेस प्रमाणपत्रच नाहीत.

-८१४ स्कूलव्हॅनपैकी ४२३कडे प्रमाणपत्र असून तब्बल ३९१ व्हॅन वाहतुकीसाठी धोकादायक आहेत, अशी माहिती आरटीओच्या खास सूत्राने ‘मटा’ला दिली.

-ऑगस्टमध्ये घोगली-वेळाहरीदरम्यान स्कूलव्हॅन नाल्यात उलटल्याने १३ विद्यार्थी जखमी झाले होते.

-या घटनेनंतर सप्टेंबरमध्ये आरटीओ अधिकारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली.

-विद्यार्थ्यांना कोंबणाऱ्या स्कूल व्हॅन व ऑटोंविरुद्ध कारवाईचा निर्णयही घेण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

-ऑक्टोबरमध्ये एका दक्ष नागरिकाने तक्रार केल्यानंतर आरटीओच्या भरारी पथकाने केवळ एका व्हॅनविरुद्ध कामठी परिसरात कारवाई केली.

Media Layoff: टेक कंपन्यांनंतर मीडिया क्षेत्रात कपात, पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात

वाहनाचा प्रकार एकूण फिटनेस प्रलंबित

नागपूर (शहर) स्कूलबस २५५ १३९ ११६

स्कूलव्हॅन ४३२ ३४७ ८५

एकूण ६८७ ४८६ २०१

वाहनाचा प्रकार एकूण फिटनेस प्रलंबित

नागपूर (पूर्व) स्कूलबस ३०२ २६८ ३४

स्कूलव्हॅन ८१४ ४२३ ३९१

एकूण १,११६ ६९१ ४२५

झाडाझडती सुरू

कोराडीतील घटनेनंतर जाग आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण उपराजधानीत स्कूलबस व स्कूलव्हॅनची झाडाझडती सुरू केली. सायंकाळपर्यंत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ३३ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून दहा वाहने जप्त केली.

हेही वाचा :  विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आयुर्वेद रुग्णालयात आता वर्षभर 'इंटर्नशिप'

अरेरे! महापालिकेच्या निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …