अर्शदीप सिंहसह उमरान मलिकचं स्वप्न साकार, फायनली एकदिवसीय संघात पदार्पणाची संधी

Team India for IND vs NZ, 1st ODI : ऑकलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताकडून या सामन्यात दोन वेगवान गोलंदाज एकदिवसीय संघामध्ये पदार्पण करत आहेत. हे दोघे म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह हे आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप आणि उमरानला संधी दिल्यामुळे दोघेही टी20 नंतर भारतासाठी प्रथमच वन डेमध्ये अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

एकदिवसीय सामन्यांपूर्वी टीम इंडियाने न्यूझीलंडवर टी20 मालिकेत 1-0 ने विजय मिळवला असून आज सामना होणाऱ्या ऑकलंडमध्ये तब्बल 9 वेळा सामना खेळवण्यात आला आहे. ज्यामध्ये टीम इंडियानं केवळ 3 वेळा विजय मिळवल्याने न्यूझीलंडचं पारडं जड आहे. अशामध्ये आज अर्शदीप आणि उमरान काय कमाल करणार हे पाहावं लागेल… हे दोन्ही वेगवान गोलंदाज टीम इंडियासाठी प्रथमच वनडे सामना खेळताना दिसणार आहेत. एकदिवसीय सामन्यांपूर्वी दोन्ही गोलंदाजांनी भारतीय संघासाठी टी-20 पदार्पण केले आहे. अर्शदीप सिंहने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता हे दोन्ही गोलंदाज पहिल्या वनडेत कितपत प्रभावी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :  मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं भावनिक वक्तव्य

शिखर आणि लक्ष्मणनं दिली एकदिवसीय कॅप

ऑकलंडमध्ये कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंह आणि उमरान मलिकसाठी हा क्षण खूप खास होता. यावेळी कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दोन्ही पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना कॅप दिली. शिखरने अर्शदीप सिंगला कॅप दिली, तर व्हीव्हीएस लक्ष्मणने उमरान मलिकला पदार्पणाची कॅप दिली. दोन्ही खेळाडूंसाठी हा क्षण खूपच स्पेशल होता.

News Reels

पाहा VIDEO-

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन 

न्यूझीलंड : फिन एलेन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, मॅट हेनरी, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन

टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

हे देखील वाचा- 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …