Couple Games जे तुमच्या नात्यात आणतील अधिक जवळीक, घ्या या गेम्सची मदत

दोन व्यक्ती केवळ नात्यात नसतात, तर हे नातं टिकविण्यासाठी अनेक गोष्टीही एकमेकांसाठी कराव्या लागतात. नात्यामध्ये नेहमीच चढउतार दिसून येतात. तुम्ही नात्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काहीतरी खास करायला हवं. हे खास म्हणजे नक्की काय?

खास करण्यासाठी आपल्या जोडीदारासह तुम्ही काही गेम्स खेळू शकता. याचे उत्तर प्रत्येक जोडीदाराचे नक्कीच वेगळे असेल. पण जेव्हा तुम्ही एकमेकांसह बाहेर फिरायला जाल, एकमेकांना वेळ द्याल तेव्हा असे गेम्स खेळणं अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या रोजच्या धावपळीपासून दूर आणि नात्यातही एक वेगळी रंगत आणि गंमत आणतात आणि नात्यात एक वेगळी ऊर्जाही आणतात. Couple Games अथवा Games That Couples Play जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

ट्रूथ अँड डेअर

ट्रूथ अँड डेअर

Truth And Dare: ट्रूथ अँड डेअर जो खऱ्या आणि हिमतीचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. पण हा गेम गंभीररित्या न घेता आपल्या जोडीदारासह मजा करण्याच्या हेतूने खेळा. तुमच्या जुन्या गोष्टींशी संबंधित प्रश्न आणि डेअर करत हा गेम जोडीदारासह खेळा. डेअरच्या वेळी मस्ती मजा असणाऱ्या गोष्टींनाच प्राधान्य द्या आणि एकमेकांच्या जवळ अधिक राहण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा :  शिवप्रताप दिनालाच नवा वाद! छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेशी मुख्यमंत्री शिंदेंची तुलना

हे की ते

हे की ते

This Or That: एकमेकांबाबत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही हा गेम खेळू शकता. दोन गोष्टींपैकी एक गोष्टीची निवड असा हा गेम आहे. यामुळे तुमचे नवे लग्न झाले असेल तर जोडीदाराबाबत अधिक गोष्टी जाणून घेऊ शकता.

  • मॉर्निंग पर्सन अथवा नाईट
  • समुद्रकिनारा की डोंगरदऱ्या
  • टीव्ही वा पुस्तकं
  • आईस्क्रिम की चॉकलेट
  • कुत्रा की मांजर
  • घरी मुव्ही नाईट की क्लबिंग नाईट
  • इनडोअर की आऊटडोअर
  • घरातील जेवण की फास्ट फूड

असे एक ना अनेक प्रश्न तुम्ही या गेम्समध्ये एकमेकांना विचारून एकमेकांची आवड जाणून घेऊ शकता. वेळही चांगला जातो आणि गंभीरताही राहात नाही.

(वाचा – Kangana Ranaut Birthday: अफेअर, ई-मेल आणि लिगल नोटीस, कंगना आणि हृतिकच्या नात्याचा झाला होता नाट्यमय शेवट)

डोळ्यात डोळे घालणे

डोळ्यात डोळे घालणे

Stare into Eyes: हा सर्वात जुना आणि तितकाच रोमँटिक गेम आहे. एकमेकांच्या डोळ्यात बघत राहणं म्हणावं तितकं सोपं नाही. डोळ्याची पापणी न लवता असं एकमेकांना पाहून गप्पा मारणं जितकं मस्त आहे तितकंच रोमँटिक आहे. कामाच्या वेळात रोमँटिकपणा विसरला असलात तर हा गेम नक्की खेळा आणि पुन्हा एकमेकांच्या प्रेमाची जाणीव करून द्या.

हेही वाचा :  Co-Sleeping: मुलांसोबत कोणत्या वयात पालकांनी झोपणं थांबवावं? 'ही' आहेत वैज्ञानिक कारणं...

(वाचा – Rani Mukherjee Birthday: विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडली राणी मुखर्जी, प्रेम जगापासून लपवावे लागले )

हसाल तर फसाल

हसाल तर फसाल

You Laugh, You Lose: हा खूप मजेशीर गेम आहे. सध्या धावपळीच्या आयुष्यात एकमेकांसह हसायलाही वेळ मिळत नाही. हँसी तो फँसी हे तर तुम्ही ऐकलंच आहे. असाच काहीसा हा गेम आहे. एकमेकांना हसविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आणि जो पहिले हसेल त्याच्याकडून हवं ते काम करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही एकमेकांबरोबर रोमँटिक क्षणही घालवू शकता.

(वाचा – International Day of Happiness: आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी मेसेज पाठवून फुलवा हास्य )

ट्यून ओळखा

ट्यून ओळखा

Guess The Tune: हा एक गेस गेम आहे जो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने खेळू शकता. घरातील सोफ्यावर, बेडवर, चालत्या गाडीत, हॉटेलमध्ये अथवा कुठेही बाहेर गेल्यानंतर तुमच्या जोडीदारासह हा गेम खेळू शकता. गाण्याची सुरूवातीची ट्यून ऐकवून जोडीदाराला गाणे ओळखायला सांगायचे. न ओळखल्यास काहीतरी हक्काने गिफ्ट मागून घ्यायचे यात खूपच मजा येते.
तुम्हीही जोडीदारासह अनेक दिवसांपासून वेळ एकत्र घालवला नसेल तर हे गेम्स नक्की ट्राय करा आणि नात्यात पुन्हा एकदा थोडा स्पाईस निर्माण करा.

हेही वाचा :  Ajit Pawar : वडिलांच्या नावाआधी आईचं नाव, अजित पवार यांची मोठी घोषणा!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …