वजन कमी करण्यासाठी वापरली जाते बुलेट कॉफी? या कॉफीचे फायदे आणि शरीरावर होणारा परिणाम

बुलेटप्रूफ कॉफी हे कॉफीमध्ये बटर आणि MCT तेल घालून बनवलेले एक नवीन पेय आहे. तुम्ही याला बटर कॉफीचा एक नवीन प्रकार मानू शकता. तिबेटमध्ये ही कॉफी खूप लोकप्रिय आहे. या कॉफीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. पण त्याचा शोध फार पूर्वी लागला होता. हे असे फॅटी ड्रिंक आहे ज्याच्या आत बरेच आरोग्य फायदे आहेत. विशेष म्हणजे ही कॉफी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया ही कॉफी बनवण्याची पद्धत आणि फायदे.

काय आहे बुलेट कॉफी

काय आहे बुलेट कॉफी

बुलेट प्रूफ कॉही ही उत्तम क्वालिटीच्या कॉफी बियांनी तयार केली जाते. कॉफीमध्ये Medium Chain Triglyceride हे अगदी तूपाप्रमाणे काम करते. कॉफीमध्ये तुम्ही योग्य प्रमाणात तूप किंवा बटर घालू शकता. या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करायच्या. त्याचे फायदे शरीराला होत असतात. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील त्याच्या दिवसाची सुरूवात या कॉफीने करतो.​

बुलेट कॉफीचे फायदे

बुलेट कॉफीचे फायदे

बुलेट कॉफी तुम्हाला दिवसभर अलर्ट, फोकस आणि ताजं तवाण राहण्यास मदत करते. अद्याप याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. पण कॉफी तुमची सकाळ अतिशय सुंदर करते. ज्यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. बुलेट कॉफीमुळे तुमचे शॉर्ट टर्म रिकॉल उत्तम राहण्यास मदत करते. एवढेच नव्हे तर दिवसाची सुरूवात ही उत्साहाने होते. कॉफी प्यायल्याने त्याचा परिणाम बराचवेळ राहतो.

हेही वाचा :  Maharashtra Day: 'चला शपथ घेऊया...', महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांची खास पोस्ट!

​(वाचा – १० प्रकारच्या लोकांनी दुधाला तोंडही लावू नये, हाडांमधील कॅल्शियम खेचून निघेल, कॅन्सरचाही धोका, रिसर्चमध्ये दावा)​

बुलेट कॉफीने भूक कमी लागते

बुलेट कॉफीने भूक कमी लागते

या कॉफीमुळे तुमच्या शरीरातील फॅट बर्न होते. यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी केटोन्समध्ये बदलू लागते. या प्रक्रियेला केटोनोसिस म्हणतात. जेव्हा तुम्ही बर्याच काळापासून कार्ब्सचे सेवन केले नाही आणि तुमची ग्लुकोजची पातळी जवळजवळ संपत नाही तेव्हा असे होते. यामुळे तुमची फॅट जळू लागते. कॉफी पिण्याचे फायदे सांगतात, ती प्यायल्यानंतर तुमची भूकही बऱ्यापैकी कमी होते. काही संशोधनात असे आढळून आले आहे की ही कॉफी तुमचे वजन कमी करण्यास मदत करते तसेच तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत करते.

​(वाचा – मिनी हार्ट अटॅक अधिक धोकादायक, त्याची लक्षणे इतर रोगांसारखी दिसतात, त्वरीत करा हे काम)​

बुलेट कॉफीमुळे वजन होते कमी

बुलेट कॉफीमुळे वजन होते कमी

बुलेटप्रूफ कॉफीमध्ये वापरलेले घटक वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये वापरण्यात येणारी कॉफी ही कॅफिनचे भांडार आहे. कॅफिन ऊर्जा वाढवते आणि भूक मारते.

तर MCT तेल म्हणजे मध्यम साखळी ट्रायग्लिसराइड्स जे त्वरीत शोषले जातात आणि उर्जेमध्ये रूपांतरित होतात. यामुळे, चरबी वाढण्याची प्रक्रिया हलकी होते आणि केटोन्सचे उत्पादन वाढते. कमी स्मरणशक्ती असलेल्या रुग्णालाही ते प्यायल्याने फायदा होतो. त्याच वेळी, ग्रास फेड बटर हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के 2, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे. जे अँटिऑक्सिडेंट्स ग्लूटाथिओन आणि सुपर ऑक्साइड डिसम्युटेजने समृद्ध आहे.

हेही वाचा :  माजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप

​(वाचा – Low Sodium Foods: सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ)​

बुलेट कॉफीचे आरोग्यदायी फायदे

बुलेट कॉफीचे आरोग्यदायी फायदे

बुलेट कॉफी हा कमी कार्ब्स आणि जास्त फॅटचे डाएट आहे. तसेच घाणेरडं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला बुलेट कॉफी आणि तुपाचे मिश्रण जास्त फायदेशीर ठरते.

​(वाचा – तूप-रोटी खाऊ अन्…. चक्क Bill Gates ही प्रेमात)​

बुलेट कॉफीमध्ये तूप

बुलेट कॉफीमध्ये तूप

तूप हे शरीराच्या आरोग्यासाठी कायमच उत्तम मानलं जातं. त्याचे असंख्य फायदे आहेतच. पण तूप आणि बुलेट कॉफी हे कॉम्बिनेशन खूपच उत्तम आहे. याचा परिणाम वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. यावर संशोधन सुरू आहे.

​(वाचा – नाभी सरकणे, नळ भरणे या समस्येवर आयुर्वेदाचा तगडा उपचार, बद्धकोष्ठता-सततच्या पोटदुखीवर ५ घरगुती उपाय)​

बुलेट कॉफीचे दुष्परिणाम

बुलेट कॉफीचे दुष्परिणाम

कोणतीही गोष्ट अती प्रमाणात ही घातकच असते. तसेच जेव्हा तुम्ही बुलेट कॉफीचे सेवन करता तेव्हा तुम्हा तुमच्या दिवसभरातील डाएटकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी तुम्ही अधिक प्रमाणातील फॅटचे सेवन करणार नाही ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  १५ दिवसात पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

ही कॉफी तुमच्या शरीराला फॅट बर्निंग मोडमध्ये ठेवते. पण यातील वाईट गोष्ट अशी आहे की यातील कोणत्याही घटकामध्ये पौष्टिक मूल्य नसते. बरेच लोक ही कॉफी अतिप्रमाणात पितात. त्यामुळे ते अनेक पौष्टिक घटकांपासून वंचित राहतात.

​(वाचा – मधुमेह, सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयविकार यासारख्या आजारांवर एकच रामबाण उपाय, छोटासा पदार्थ पण मोठा गुणकारी)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …