माजी डच पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू; हातात हात धरून घेतला जगाचा निरोप

Dries van Agt : नेदरलँड्सचे माजी डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन अगट यांनी सोमवारी त्यांच्या पत्नीसह मृत्यूला कवटाळलं. जेव्हा दोघांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे हात एकमेकांच्या हातात होते. दोघांचेही वय 93 वर्षांचे होते. गेल्या 70 वर्षांपासून ते एकत्र होते. त्यानंतर दोघांनी एकत्र इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. नेदरलँड्सचे 1977 ते 1982 पर्यंतचे डेमोक्रॅट पंतप्रधान ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला असल्याचे माजी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

शुक्रवारी या जोडप्याचा मृत्यू झाला आणि पूर्वेकडील निजमेगेन शहरात एका खाजगी समारंभात त्यांना दफन करण्यात येणार आहे. “प्रिय पत्नी युजेनी व्हॅन एग्ट-क्रेकेलबर्ग यांच्यासोबत ड्राईस व्हॅन यांचे निधन झाले. दोघेही नेहमी एकत्रच राहत होते आणि 70 वर्षांहून अधिक काळ एकमेकांना साथ देत होते. माजी पंतप्रधान नेहमी त्यांच्या पत्नीला ‘माय गर्ल’ म्हणत,” असे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

ड्राईस आणि त्यांची पत्नी युजेनी व्हॅन एग्ट-क्रेकेलबर्ग हे दोघेही बऱ्याच काळापासू आजारी होते. तसेच 2019 मध्ये, व्हॅन एग्ट यांना ब्रेन हॅमरेज झाला ज्यातून ते कधीही बरे झाले नाहीत. त्यामुळे अखेर दोघांनीही इच्छामरणाच्या (यूथेनेसिया) मदतीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :  Pune By Election : 'आमची मतं हवीत, आमचा उमेदवार नको'...ब्राम्हण समाज नोटाला मतदान करणार?

व्हॅन ऍग्ट राजकारणातून बाहेर पडल्यानंतर अधिकाधिक प्रगतीशील बनले. त्यानंतर 2017 मध्ये, इस्रायल आणि पॅलेस्टिनींबद्दलच्या मध्य-उजव्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक अपीलच्या दृष्टिकोनाशी वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी आपला पक्ष सोडला. डच पंतप्रधान मार्क यांनी व्हॅन यांना ऑफिसमधील आजोबा म्हटलं होतं.

यूथेनेसिया म्हणजे काय?

यूथेनेसिया दोन ग्रीक शब्दांपासून बनलेले आहे, ज्याचा अर्थ चांगला मृत्यू आहे. याच्या मदतीने रुग्णाला इच्छामरण दिले जाते. जेव्हा एखादा रुग्ण दीर्घकाळ गंभीर आजाराने ग्रस्त असतो आणि बरा होत नाही तेव्हाच याचा वापर केला जातो.

युथनेशिया सोल्यूशन हे बार्बिट्युरेट आहे. म्हणजेच सामान्य भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्याच वर्गातील औषध. जेव्हा ते एखाद्याला खूप जास्त प्रमाणामध्ये दिले जाते, तेव्हा हे द्रावण शरीरात केवळ भूलच देत नाही तर हृदय आणि श्वसन प्रणाली देखील थांबवते. त्यामुळे रुग्णाचा तात्काळ मृत्यू होतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …