सोयाबिनच्या सेवनामुळे पुरूषांमध्ये वाढतात महिलांचे हार्मोन्स, प्रजनन क्षमतेवर निर्माण होते प्रश्नचिन्ह

सोयाबीन हे आरोग्यदायी अन्न असून अनेकांच्या आहारात याचा समावेश असतो. ज्यापासून शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे सोयाबीन जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही तोटे होऊ शकतात. सर्वात मोठी शंका पुरुषांमध्ये महिला हार्मोन्सची वाढ होणे ही आहे.

सोयाबीनचे सेवन केल्याने काही फायदे देखील होतात. हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय, हाडांच्या मजबूतीसाठी देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)

सोयाबिनचे पोषणतत्व

सोयाबिनचे पोषणतत्व

सोयाबीनचे तोटे जाणून घेण्याआधी, या सोया चंक्समध्ये असलेल्या पोषणाविषयी जाणून घेऊया. हेल्थलाइननुसार, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, तांबे, मॅंगनीज, सेलेनियम, थायामिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट सारखे आवश्यक घटक देखील या प्रोटीनयुक्त अन्नामध्ये आढळतात.

​(वाचा – आहारातील धान्यच वात, पित्त आणि कफाला जबाबदार; बद्धकोष्ठता, गॅस टाळण्यासाठी कोणत्या Millets चा कराल समावेश)​

पुरूषांम्ध्ये महिला हार्मोन्स वाढतात

पुरूषांम्ध्ये महिला हार्मोन्स वाढतात

सोया उत्पादनांशी संबंधित एक संकल्पना खूप वेगाने पसरली होती की ते पुरुषांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन वाढवते. जे महिलांचे प्रमुख हार्मोन आहे आणि त्यांच्याप्रमाणेच पुरुषांच्या शरीरात काही बदल येऊ लागतात आणि प्रजनन क्षमता संपुष्टात येऊ लागते. पण, पबमेडवर प्रकाशित झालेल्या संशोधनासह अनेक संशोधकांनी हे खरं नसल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनी सोयाबिन मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा :  डीपनेक चोळी व वाईन रेड लेहंग्यातील न्यासाने केलं पार घायाळ, चाहत्यांना दिसली काजोलची झलक

(वाचा – हार्ट अटॅकचा धोका मुळापासून उपटून टाकेल ही चटणी, रक्त पातळ करण्यास होईल मदत)​

थायरॉईडचे कार्य बिघडू शकते

थायरॉईडचे कार्य बिघडू शकते

काही चाचणी ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासात सोयाबीनमध्ये थायरॉईड-विघटन करणारे पदार्थ दिसून आले आहेत. त्यामुळे थायरॉईडचा त्रास असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप मानवांवर आधारित संशोधन आवश्यक आहे.

(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)

बद्धकोष्ठता आणि अतिसार होण्याचा धोका

बद्धकोष्ठता आणि अतिसार होण्याचा धोका

NCCIH च्या मते, हे अन्न खाण्याचा सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे पोट खराब होणे. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि अतिसाराचा धोका वाढू शकतो. या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनीही ते खाणे टाळावे.​

(वाचा – थोडी थोडी लघवीला होणे, धार कमी होणे? ब्लॅडरला आतून पोखरून टाकतायत ८ जीवघेणे आजार)​

सोयाबीन खाण्याचे इतर तोटे

सोयाबीन खाण्याचे इतर तोटे
  • गर्भाशयात गर्भाच्या विकासास प्रतिबंध
  • भिजवून किंवा न शिजवता खाल्ल्याने पोषण शोषण्यास प्रतिबंध होतो
  • स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये काही गडबड होऊ शकतेटीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
हेही वाचा :  मुलं टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलंय, अशावेळी पालकांनी काय कराव? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का?

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …