film producer arrestred for using froud money in film making zws 70 | फसवणुकीच्या रकमेतून चित्रपटाची निर्मिती?


घरासाठी दिलेल्या पैशांचा वापर त्यांने मुलाच्या चित्रपट निर्मितीसाठी करून तक्रारदारांची फसवणूक केली

मुंबई: घर विक्रीच्या नावाखाली एका जाहिरात व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका बंगाली चित्रपट निर्मात्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. आरोपीने फसवणुकीच्या रकमेतून चित्रपटाची निर्मिती केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

तक्रारदार जाहिरात व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर चेंबूर परिसरात राहतात. गेल्या काही वर्षांपासून ते एक मोठे घर खरेदी करण्याच्या विचारात होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. त्यांनी काही घरेही पाहिली होती. चार वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांची आरोपी अरिंधरकुमार बॅनर्जीशी भेट घडवून आणली होती.

अरिंधरकुमार यांचा जोगेश्वरीतील आदर्शनगरमधील शिवशिवम अपार्टमेंटमध्ये स्वत:चे घर होते. तक्रारदारांना बॅनर्जी यांचे घर आवडल्यामुळे त्यांनी ते खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. करारानुसार त्यांनी अरिंधरकुमारला आधी २५ लाख रुपये दिले. नंतर त्यांनी त्यांचा चेंबूर येथील घराची विक्री करून त्यातून आलेले ७५ लाख रुपये त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले होते. हा संपूर्ण व्यवहार अरिंधरकुमार, त्यांची पत्नी आकांक्षा आणि मुलगा विकी यांच्यासमोर झाला होता. काही दिवसांत त्यांना घराचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र वारंवार विचारणा करूनही त्यांनी घराचा ताबा दिला नाही. विविध कारण सांगून ते त्यांना टाळत होते.

हेही वाचा :  Crime News: प्रियकरासोबत मिळून भावाची हत्या, नंतर मृतदेहाचे केले तुकडे; 8 वर्षांनी झाला उलगडा

अरिंधरकुमारने तक्रारदाराला एक कोटी दहा लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र बँक खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने तो धनादेश वठला नाही. दरम्यान तक्रारदारांना अरिंधरकुमार हा कोलकाता येथे गेला होता. तिथे त्याने त्यांच्या मुलासाठी एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली.

घरासाठी दिलेल्या पैशांचा वापर त्यांने मुलाच्या चित्रपट निर्मितीसाठी करून तक्रारदारांची फसवणूक केली, असा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात अरिंधरकुमारसह त्याची पत्नी आणि मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. शोध मोहीम सुरू असताना शनिवारी पोलीस पथकाने अरिंधरकुमारला अटक केली. या गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …