नवजात बाळ विक्रीत स्वयंसेवी संस्थांचेही हात काळे!; मुला-मुलींचा वेगवेगळा सौदा; अनाथालयाच्या नावावर गैरप्रकार | NGOs involved selling newborn babies Different deals boys and girls Malpractice in the name of an orphanage amy 95


नवजात बाळाची खरेदी-विक्री प्रकरणाचे तार थेट काही स्वयंसेवी संस्थांशी जुळलेले असून ग्राहक दाम्पत्यांचा शोध घेऊन बाळ सोपवण्यापर्यंतची भूमिका संस्थेमार्फत वठवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनिल कांबळे

नागपूर : नवजात बाळाची खरेदी-विक्री प्रकरणाचे तार थेट काही स्वयंसेवी संस्थांशी जुळलेले असून ग्राहक दाम्पत्यांचा शोध घेऊन बाळ सोपवण्यापर्यंतची भूमिका संस्थेमार्फत वठवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उपराजधानीत नवजात बाळ विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले असून यामध्ये शहरातील काही नामांकित डॉक्टरांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था किंवा स्वयंसेवी संस्थामार्फत (एनजीओ) अनाथालय चालवण्यात येते. अनाथालय चालवण्याच्या नावाखाली बनावट संस्था उभ्या करून नवजात बाळांना स्वीकारले जाते. ही टोळी बोगस संस्थेबाबत प्रसार-प्रचार करते. त्यानंतर बाळ नको असलेले गरीब दाम्पत्य किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाच्या आईची व नातेवाईकांची भेट घेऊन बाळांना स्वयंसेवी संस्थेला देण्यासाठी बाध्य केले जाते. त्यानंतर ती बोगस स्वयंसेवी संस्था त्या नवजात बाळाचा सौदा करण्यासाठी निपुत्रिक दाम्पत्यांचा शोध घेऊन बाळाची ३ ते ६ लाखांत विक्री करते.

हेही वाचा :  '...तर 2026 ला देश कर्जात बुडेल, जगण्यासाठी दारुडा जसा..'; मोदींचा उल्लेख करत आंबेडकरांचा टोला

चक्क बोली लागते

अनेक दाम्पत्याचा मुलासाठी हट्ट असतो. अनाथालय किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून दाम्पत्य नवजात मुलाची मागणी करतात. त्यासाठी ते सहा महिने ते वर्षभर थांबण्याची तयारी दर्शवतात. असे गरजू दाम्पत्य हेरून चक्क मुलाची बोली लावून जास्त पैसे देणाऱ्या दाम्पत्याला मुलाची विक्री केली जाते.

पोलिसांनी सतर्कता दाखवावी

नागपूर पोलिसांनी अशा मानव तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. नवजात बाळ विक्री करण्यासाठी मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील दाम्पत्यांना प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थेच्या नावावर नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ांचा पोलिसांनी भंडाफोड करणे  गरजेचे आहे.

नागपुरातील काही प्रकरणे..

मुंदडा दाम्पत्य सरोगेसी सेंटरच्या नावावर दिघोरी परिसरात शेल्टर होम चालवत.ते गरीब कुटुंबातील महिलांना आमिष दाखवून बाळाचा सौदा करायचे. आरोपींनी डिसेंबर २०१७ मध्ये केवळ १२ दिवसांच्या नवजात बाळाचा सव्वादोन लाखांत सौदा केला होता. याप्रकरणी धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल आहे.  गेल्या महिन्यात चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात प्रसूत  मातेला एड्स झाल्याची भीती दाखवून तिचे नवजात बाळ नागपुरातील परिचारिका वनिता कावडे, पूजा साहू, शालिनी मोडक यांना २ लाख ७५ हजार रुपयांत विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा :  'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे

बाळ विक्रीचे असेच एक प्रकरण नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही उघडकीस आले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …