Sharad Pawar : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार, शरद पवार यांची माहिती

Maharashtra Political News : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. 2024 मधील विधानसभा (Assembly Elections) आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections)काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. (Sharad Pawar press conference in Kolhapur ) यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आणि काँग्रेस (Congress) तसेच शिवसेना (Thackeray Group) या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही, असे त्यांनी यावेळी भाष्य केले.  

तुरुंगात डांबण्याची भाषा चुकीची – पवार

पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन काम करायचे असते. मात्र, अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे  काम नाही. त्यांच्याकडून इतरांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जात आहे, हे चुकीचे आहे. जरी शिवसेनेत दोन गट पडले असले तरी कडवा शिवसैनिक हा प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहे. तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा फायदाच होणार आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील, असेही शरद पवार म्हणाले. 

हेही वाचा :  Nagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपावर बोलण्याचे पवार यांनी टाळले. तुरुंगात टाकण्याची भाषा चुकीचे असे सांगत विषयाला बगल दिली. राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी  राणे यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली होती. 

 राज्यातील सरकार कधी पडणार?, पवार म्हणाले – मी मुंबईत…

राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार फेब्रुवारीत पडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर शरद पवार यांना सवाल करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले, याबाबत मला काही माहिती नाही. आता मी मुंबईला गेल्यावर संजय राऊत यांच्याशी बोलेन आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी शरद पवार यांनी केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …