Rishabh Pant : दुखापतग्रस्त ऋषभ पंतला मिळणार आयपीएलची संपूर्ण सॅलरी, वाचा सविस्तर 

IPL 2023, Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला काही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहणार असून यंदा खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2023) देखील पंत सहभागी होऊ शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीने स्वतः यष्टीरक्षक फलंदाज आयपीएलचा भाग नसल्याची माहिती दिली. याबाबत एका पत्रकाराशी बोलताना गांगुली म्हणाला, “पंत आयपीएलसाठी उपलब्ध होणार नाही. मी दिल्ली कॅपिटल्सच्यावतीने हे सांगत आहे. पंतच्या दुखापतीचा दिल्ली कॅपिटल्सवर परिणाम होईल पण असं असतानाही आयपीएल न खेळल्यानंतरही त्याला पूर्ण पगार दिला जाणार आहे. 

न खेळताही संपूर्ण आयपीएलचा पगार मिळणार

पंत आयपीएलचा भाग नसला तरी त्याला दिल्लकडून पूर्ण वेतन दिले जाणार आहे. बीसीसीआय पंतला दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेल्या 16 कोटी रुपयांच्या आयपीएल पगाराची पूर्ण भरपाई करेल. आयपीएल वेतनाव्यतिरिक्त, बोर्ड पंतला त्यांच्या 5 कोटी रुपयांच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टसाठीचे संपूर्ण पैसे देखील देणार आहे.

डेहराडूनहून मुंबईला केलं शिफ्ट 

हेही वाचा :  टीम इंडियातून विश्रांतीवर असणाऱ्या पंतचा भीषण अपघात, सर्वत्र जखमा, पुन्हा मैदानावर उतरु शकणार?

news reels

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या गुडघ्यावर (लिगामेंटवर) डेहराडूनमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईला आणण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, लिगामेंट सर्जरीनंतर पंतला बरं वाटत आहे. याआधी पंतला अनेक दिवस डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे प्राथमिक उपचार म्हणून त्याच्या शरीराच्या काही भागांची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.

रुरकीला जाताना झाला अपघात

ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती.  याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेशिवाय तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर राहू शकतो. जर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ घेतला तर पंत 2023 च्या विश्वचषकातूनही बाहेर राहू शकतो.

हेही वाचा :  भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत रंगणार स्मिथ विरुद्ध अश्विन युद्ध, जाणून घ्या खास आकडेवारी 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …