Tag Archives: Education News in Marathi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वगळता अन्य वर्षांच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु, आठवडाभरापूर्वी फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आमच्या परीक्षेचे काय?, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. फार्मसीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट …

Read More »

MPSC Recruitment: साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त

पुणे : राज्यात तब्बल साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त असताना, सरकारकडून केवळ काही विशिष्ट विभागांमधील पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही पदांच्या परीक्षेची शेवटची जाहिरात प्रसिद्ध होऊन २५ वर्षांचा काळ लोटला असून, जागा रिक्त असतानाही परीक्षेच्या जाहिराती का प्रसिद्ध होत नाहीत, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.२०१८ साली मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ …

Read More »

MBBS च्या वर्गात शिकायचा बारावीचा विद्यार्थी, कॉलेजलाही थांगपत्ता नव्हता पण…

HSC student studying in MBBS class: आपल्या वयापेक्षा मोठ्या इयत्तेच्या वर्गात जाऊन शिक्षण घेणाऱ्या रॅंचोची कहाणी आपण थ्री इडियट सिनेमातून ऐकली असेल. पण चुकीच्या गोष्टीसाठी असे प्रकार करणारे ‘रॅंचो’ची संख्या देखील कमी नाही. केरळच्या कोझिकोड मेडिकल कॉलेजमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे बारावीचा एका विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पण हे प्रकरण भलतेच असल्याचे सर्वांच्या लक्षात आल्याने …

Read More »

मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालापूर्वीच फेरपरीक्षेचा घाट

म. टा. प्रतिनिधी मुंबई मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यापीठाने परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदतही गुरुवारी संपली. त्यामुळे पुर्नमुल्यांकनाच्या निकालाची वाट पाहायची की पुर्नपरीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा मे २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी …

Read More »

Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर

Talathi Recruitment 2022: तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी नागपूर अन्वये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ …

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या गट ‘ब’, गट ‘क’ व गट ‘ड’ पदभरती परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसल्याचा संशय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. विद्यापीठाने या परीक्षेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेमार्फत करण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत १४० पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा जवळपास १४ हजार उमेदवारांनी दिली होती. ३ …

Read More »

‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडखासगी विनाअनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतून अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय किंवा तुकडीवर बदली करण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शासन निर्णयास स्थगिती देण्याच्या विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटनांची झोप उडाली आहे. या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक संघटनांनी मोठा विरोध दर्शविला असून, नाशिकमध्येही मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब …

Read More »

शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

म. टा. प्रतिनिधी,पुणेकॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांमध्ये मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आता पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रथमच मतदार साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पहिला प्रयोग करण्यात येत असून, मोहिमेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्रासह क्रेडिट पॉइंटही मिळणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील ४३ कॉलेजांसह १५ शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळ स्थापन होणार आहे. ९० विद्यार्थ्यांची …

Read More »

JEE Mains: जेईई मेन्स परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

JEE Mains:जेईई मेन्सच्या परीक्षेत गणित, फिजिक्स, केमिस्ट्री असे तीन विषयांचे पेपर्स द्यावे लागतील. याशिवाय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि प्लानिंग अशा तीन शाखांच्या पदवी प्रवेशासाठी ही प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. यावर्षी जून आणि जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच ट्रिपल आयटीमध्ये प्रवेश घेता येतो.   जेईई मेन्स …

Read More »

‘स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शाळाप्रवेश थांबणार नाहीत’

School admissions : ‘शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत’, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.‘राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक वा माध्यमिक शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्याला आता सुलभ प्रवेश …

Read More »

MPSC: गट ‘क’ पदांसाठी आयोग घेणार भरती

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील ‘क’ गटाची सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता या पदभरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महसूल विभागातील गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ला परवानगी देण्यात आली असून, जानेवारी महिन्यात एमपीएससी प्रथमच गट ‘क’च्या पदांसाठी जाहिरात काढणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले …

Read More »

TET Scam: शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) गैरव्यवहारातील साडेसात हजारांहून अधिक शिक्षक अडकले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातीसल १६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारपासून सुरू केली आहे. त्यामुळे ‘पवित्र पोर्टल’द्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांऐवजी ‘टीईटी’द्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संकेत दिले आहेत. …

Read More »

धक्कादायक! मराठी शाळांची पटसंख्या आली निम्म्यावर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या १० वर्षांत ५० टक्क्यांनी घटली आहे. पालिकेच्या शाळेत २०१२-१३ मध्ये १ लाख ३ हजार विद्यार्थी शिकत होते. ही संख्या घटून २०२१-२२ मध्ये ५१,६९१ पर्यंत खाली आली आहे. मराठीपाठोपाठ पालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ४४ टक्क्यांनी, उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. त्याचवेळी पालिकेच्या इंग्रजी …

Read More »

CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचिन्ह

वृत्तसंस्था, पणजीराष्ट्रीय विधी विद्यापीठांतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी येथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामायिक प्रवेश चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांत प्रवेश दिला जातो. परंतु प्रवेशासंबंधीचे हे स्वरूप परिपूर्ण नसून कायदा व न्यायाविषयी कळकळ असणारे विद्यार्थी त्यातून निर्माण होतीलच याची शाश्वती नाही, असे ते म्हणाले. ‘इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च’ या संस्थेतर्फे …

Read More »

राज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही, शिक्षण विभागाच्या मोहिमेतून माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादराज्यातील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या मोहिमेतून समोर आली आहे. ३९ लाख विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदच होत नाही. यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली असून, विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल प्रणाली’त भरताना मोठी अडचण येत आहे. विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधारकार्ड नोंदणी गरजेची आहे. माहिती भरण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. ही …

Read More »

राज्यातील महाविद्यालयांचे होणार ऑडिट

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘राज्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे,’ अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शुक्रवारी दिली. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जून २०२३पासून करण्यात येणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम हा त्यातील पहिला टप्पा असून, त्यासाठी सरकारी महाविद्यालयांचा ‘संस्था विकास आराखडा’ (आयडीपी) तयार करण्यात येणार असल्याचेही डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले. उच्च …

Read More »

OBC Students Hostel: ओबीसी वसतिगृहांसाठी ३२ जिल्ह्यांत जागा मिळेना!

नागपूर : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९मध्ये घेतला. या वसतिगृहांसाठी जागेचा शोध घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या निर्णयाला पावणेचार वर्षे उलटले तरी एकूण ३६पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये शासकीय जागाच उपलब्ध झालेली नाही. केवळ चार जिल्ह्यांतच जागा मिळाली. हा विषय मार्गी लावण्यासाठी आता अशासकीय संस्थांना ही वसतिगृहे चालविण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. …

Read More »

दहावीच्या सराव परीक्षेला सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईविद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर व्हावी, त्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणून गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणारी एसएससी सराव परीक्षा शनिवारपासून नवी मुंबईत सुरू होत आहे. या सराव परीक्षेला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदा त्याचे २४ वे वर्ष आहे. या परीक्षेच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगला सराव करता येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव, …

Read More »

IITच्या ३२ विद्यार्थ्यांचे ‘कोटी’ उड्डाण, पहिल्याच प्लेसमेंटमध्ये घसघशीत वार्षिक पॅकेज

वृत्तसंस्था, नवी दिल्लीकरोनापश्चात झालेल्या पहिल्याच प्रत्यक्ष प्लेसमेंट मोहिमेत आयआयटीच्या ३२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑफर्समध्येही यंदा वाढ झाल्याचे दिसून आले. प्लेसमेंट मोहिमेंतर्गत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आयआयटी मद्रासच्या किमान २५, तर आयआयटी गुवाहाटीच्या पाच, तर आयआयटी रूरकीच्या दोन विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज दिले आहे. आयआयटी मद्रासने यावर्षी आत्तापर्यंतच्या सर्वोच्च …

Read More »

पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी

Police Recruitment: पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील १०३१ उमेदवारांची शारीरिक चाचणी दिनांक २८ नोव्हेंबर, २०२२ ते दि. …

Read More »