Tag Archives: बॉलिवूड

जया बच्चन करिश्मा कपूरला म्हणाल्या होत्या, ‘ही माझी होणारी सून’

Jaya Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे लग्न होऊन जवळपास 15 वर्ष झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळतेय. ऐश्वर्या आणि अभिषेकनं 2007 साली लग्नगाठ बांधली. पण काही वर्षांपूर्वी अभिषेकचं नाव हे अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) जोडले जात होते. एवढंच नाहीतर त्या दोघांच्या लग्नाच्या …

Read More »

सुकेश चंद्रशेखर विरोधातील चार्जशीटमधून गौप्यस्फोट; अभिनेत्रीचे गंभीर आरोप

Sukesh Chandrashekhar Chargesheet:  200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrashekhar) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) देखील चौकशी केली जात आहे. आता सुकेश चंद्रशेखर विरोधात तिसरी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या चार्जशीटनुसार, एका अभिनेत्रीनं सुकेशवर काही आरोप केले आहेत. …

Read More »

‘वाट पाहत होतो, आला का नाहीस?’ मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा किंग खानला प्रश्न

Shah Rukh Khan’s Reply to Fan Waiting Outside Mannat: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या  पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची …

Read More »

Sushant Singh Rajput : सुशांतची हत्या की आत्महत्या? अडीच वर्षानंतरही न सुटणारं कोडं

Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुशांत आज या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी कायम आहेत. सुशांतच्या (Sushant Singh Rajput Birth Anniversary) जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता,”मला मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते”.  सुशांत मुंबईतील वांद्रे येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने …

Read More »

परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  नीना गुप्ता (Neena Gupta) या वेगवेगळ्या वेब सीरिजमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर …

Read More »

अमिताभ बच्चन यांनी घेतली फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् मेस्सीची भेट

Amitabh Bachchan Video:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या बिग बी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन (Riyadh Eleven) आणि पॅरिस सेंट जर्मन (PSG) यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्याची …

Read More »

प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’, असंही म्हटलं जातं. ‘देसी गर्ल’ प्रियांकाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर (British Vogue Magazine)  झळकली आहे. प्रियांका ही या मासिकाच्या …

Read More »

प्रियांका चोप्राने ‘जॉयलँड’ चित्रपटाचं केलं कौतुक; शेअर केली पोस्ट

Priyanka Chopra: जॉयलँड (Joyland) हा पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आलं आहे. जॉयलँडचे दिग्दर्शन सॅम सादिक (Saim Sadiq) यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 नोव्हेंबरला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण नंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. आता या चित्रपटाचं अभिनेत्री …

Read More »

फोटोग्राफरवर भडकल्या जया बच्चन; म्हणाल्या…

Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल (17 जानेवारी) इंदूरच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे वर्च्युअली उपस्थित होते. नुकताच जया बच्चन यांचा इंदूर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहे, असं …

Read More »

कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिलात? सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की …

Read More »

फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का?

Celebs Childhood Pics: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?’, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट …

Read More »

‘शाहरुख खानचा चित्रपट म्हणून…’; ‘पठाण’ मधील बेशरम रंग गाण्याच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्

Sanjay Raut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. आता या वादावर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी न्यूजच्या Press Conference या शोमध्ये संजय राऊत …

Read More »

Urfi Javed : उर्फी जावेदने केली देशाची तालिबानसोबत तुलना

Urfi Javed : बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ या ट्विटर वॉरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाची आता पोलिसांनीदेखील दखल घेतली आहे. उर्फीने आज मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर एक ट्वीट करत देशाची तालिबानसोबत तुलना केली आहे.  मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर उर्फीने प्राचीन फोटो शेअर …

Read More »

पठाणच्या ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ साठी शाहरुखच्या चाहत्यांनी केली जय्यत तयारी

Shah Rukh Khan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.  शाहरुख हा चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक आहे. पठाण …

Read More »

जाणून घ्या ‘कुत्ते’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Kuttey Box office Collection:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांचा मुलगा आसमान भारद्वाजचा  ‘कुत्ते’ (Kuttey) हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची अनेक प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. पण आता या चित्रपटाचा ओपनिंग-डेचे कलेक्शन समोर आले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे.  कुत्ते चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अभिनेता …

Read More »

Nora Fatehi : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेही न्यायालयात हजर

Nora Fatehi Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोराने या प्रकरणाबाबत न्यायालयात जबाब नोंदवला आहे. यासंदर्भात वकील वी.एस चौहान (VS Chauhan) यांनी माहिती दिली आहे.  नोरा फतेहीने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी न्यायालयात …

Read More »

Sanjay Dutt : डॉक्टरांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली : संजय दत्त

Sanjay Dutt On Cancer Battle : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली असली तरी त्याची मरण्याची इच्छा होती.  संजय दत्त गेल्या वर्षी ‘केजीएफ 2′ (KGF 2) या सिनेमात …

Read More »

अथिया-राहुलचा शाही विवाहसोहळा 3 दिवस चालणार

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर राहुल शेट्टी (Rahul Shetty) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवस त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.  अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा लग्नसोहळा …

Read More »

Jackie Chan : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याची लेक ‘बेघर’

Jackie Chan : अभिनेता जॅकी चॅनची (Jackie Chan) गणना जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. जॅकी तब्बल 520 मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण तरीही त्याच्या मुलीकडे राहायला घर नाही आहे.  जॅकी चॅन अभिनेता असण्यासोबत मार्शल आर्टिस्ट, स्टंटमॅन, सिने-दिग्दर्शक, कोरियोग्राफर, लेखक, निर्माता आणि गायक आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चाहते नेहमीच त्याचा …

Read More »

Gandhi Godse Ek Yudh : ‘गांधी गोडसे एक युद्ध’चा ट्रेलर आऊट

Gandhi Godse Ek Yudh Trailer Out Now : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’च्या ट्रेलरमध्ये काय आहे? (Gandhi Godse Ek Yudh Trailer Out ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाचा ट्रेलर गांधी …

Read More »