जया बच्चन करिश्मा कपूरला म्हणाल्या होत्या, ‘ही माझी होणारी सून’

Jaya Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे लग्न होऊन जवळपास 15 वर्ष झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळतेय. ऐश्वर्या आणि अभिषेकनं 2007 साली लग्नगाठ बांधली. पण काही वर्षांपूर्वी अभिषेकचं नाव हे अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) जोडले जात होते. एवढंच नाहीतर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. सध्या 2002 मधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, जया बच्चन (Jaya Bachchan) या करिश्माच्या नावाचा उल्लेख करताना ‘ही माझी होणारी सून’ असं म्हणतायत. 

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सर्व बच्चन कुटुंब हे एकाच मंचावर आहे. यावेळी जया बच्चन म्हणतात की, ‘मी कपूर कुटुंबाचे आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये स्वागत करते. रणधीर आणि बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर यांचं मी स्वागत करते.’ त्यानंतर करिश्मा स्टेजवर येते. 

हेही वाचा :  कुणी तरी येणार गं.... सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

पाहा व्हिडीओ: 

news reels New Reels

करिश्मा आणि अभिषेक हे एकमेकांना जवळपास पाच वर्ष डेट करत होते. 2003 मध्ये करिश्मा आणि अभिषेक हे विवाह बंधनात अडकणार होते, असं म्हटलं जात होतं. पण नंतर ऐश्वर्यानं त्याच वर्षी म्हणजेच, 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला.

करिश्माचे आगामी प्रोजेक्ट

करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की, वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे.

अभिषेकचे चित्रपट

अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी अभिषेक हा ‘ब्रिथ इन टू द शॅडो’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या वेब सीरिजचे दोन सिधन प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

हेही वाचा :  Janhvi Kapoor : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूरचं जोडलं जातंय नाव

महत्वाच्या इतर बातम्या: 

Karisma Kapoor: करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप; एका ड्रेसमुळे संजय कपूरनं उचललं होतं ‘हे’ पाऊल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …