Tag Archives: बॉलिवूड

आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी …

Read More »

कधी काळी रस्त्यावर चहा अन् लॉटरी तिकीट विकायचे अन्नू कपूर, ‘अंताक्षरी’ने अभिनेत्याला दिली खरी ओ

Annu Kapoor Birthday : आयुष्यातील सर्व अडचणींमध्येही जी व्यक्ती आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवते, हरत नाही, तीच व्यक्ती नेहमी यशस्वी होते. अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) याचे उत्तम उदाहरण आहेत. 20 फेब्रुवारी 1965 रोजी भोपाळमध्ये जन्मलेले अन्नू कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता गायक, रेडिओ जॉकी, टीव्ही होस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात भरपूर काम केले आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अन्नू …

Read More »

‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जो

Prabhas-Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत. बच्चन साहेबांची सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल …

Read More »

Jiah Khan Birth Anniversary : प्रेमात मिळाला मोठा धोका, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जिया खाननं

Jiah Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा (Jiah Khan) जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये अली रिझवी खान आणि राबिया अमीन यांच्या घरी झाला होता. तिचे खरे नाव नफिसा रिझवी खान होते. जिया खान अवघ्या दोन वर्षांची असताना तिचे वडील घर सोडून गेले. जिया जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हा ती ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात …

Read More »

Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jhund New Song : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाची गाणी रिलीज करत आहेत. ‘झुंड’ चित्रपटातील गाणे ‘आया ये झुंड’नंतर आता ‘लफडा झाला’ (Lafda Zala) हे दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 4 मिनिटांच्या या फूट टॅपिंग बीट्स …

Read More »

तब्बल 6 वर्षांनी मोठी होती पहिली पत्नी, 17 वर्षांच्या नात्यानंतर झाला फरहान-अधुनाचा घटस्फोट!

Farhan-Adhuna Divorce : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) लवकरच शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघेही मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. याआधी फरहानने अधुना भाबानीशी (Adhuna Bhabani) लग्न केले होते, पण त्यांचे नाते टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. अधुना आणि फरहान यांचा 2017मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट झाला होता. दोघेही …

Read More »

ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!

Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding Rituals: शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे ‘पॉवर कपल’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच दोघांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. फरहान आणि शिबानीच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे जोडपे मुस्लिम पद्धतीने ‘निकाह’ करणार …

Read More »

‘अब की बार प्यार ही प्यार..’, रस्त्यावर उभं राहून अभिनेत्री लोकांना देते ‘Free Hug’!

Free Hug : अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) रिलेशनशीप आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिचा चक्क रस्त्यावर उभं राहत, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मिठी मारत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रिचा सध्या तिच्या ‘वेट लॉस’मुळे देखील चर्चेत आहे. रिचाने गेल्या तीन महिन्यात तब्बल 15 किलो वजन घटवले आहे. …

Read More »

‘मुझे भाई नहीं गॉड फादर बोलते है’ बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज; अक्षयचा हटके लूक

Bachchan Pandey Trailer : बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडेचा (Bachchan Pandey) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  या ट्रेलरला पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या ट्रेलरमधील अक्षय कुमारच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  18 मार्च रोजी होळीच्या …

Read More »

Farhan Shibani Wedding: शिबानी दांडेकर बनणार जावेद अख्तरांची सून, ‘या’ दिवशी फरहानसोबत बांधणार

Farhan Shibani Wedding : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही आता लवकरच  सातफेरे घेणार आहेत. फरहान लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. फरहान आणि शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनीही आपल्या नात्याला एक पाऊल …

Read More »

Bollywood Film Release 2022: बॅक टू बॅक मनोरंजनाची मेजवानी, वर्षभरात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार

Bollywood film in 2022 : कोरोनाची लाट (Corona Virus) काहीशी ओसरताना आता देशभरातील सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होताना दिसत. देशभरातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही महिन्यांत असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे सर्वांचे भरपूर मनोरंजन करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल या वर्षी मोठ्या पडद्यावर धमाका करणार …

Read More »

Dhanush : रजनीकांतच्या लेकीशी फारकत, आता ‘या’ खास व्यक्तीसोबत वेळ घालवतोय साऊथ स्टार धनुष!

Dhanush Aishwarya Rajinikanth Divorce: ‘अतरंगी रे’ अभिनेता धनुष (Dhanush) पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त झाला आहे. धनुष सध्या निसर्गरम्य उटीमध्ये ‘Naane Varuven’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून मोकळा वेळ काढत अभिनेता इथल्या निसर्गसौंदर्याचा देखील आनंद लुटत आहे. ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यावर आता धनुष त्याचा मुलगा याथ्रासोबत (Yathra Dhanush) वेळ घालवत आहे. …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’वरून नवा वाद, मुलगा म्हणाला ‘माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात….’

Gangubai Kathiawadi Controversy : ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील यात कॅमिओ रोल करत आहे. मात्र, गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, …

Read More »

मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजा

Mika Singh : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे …

Read More »

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. …

Read More »

“ट्रेनमधून उडी मारायची इच्छा व्हायची…”, मृणाल ठाकूरने केला धक्कादायक खुलासा

मृणाल ठाकूर सगळ्यात शेवटी ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिला अभिनेत्री नाही तर क्राईम जर्नलिस्म करायंच होतं आणि टिव्हीवर दिसायंच होतं, असा खुलासा केला आहे. पण तिच्या आई-वडिलांची ही इच्छा होती की तिने डेन्टिस्ट व्हावे. मृणालने नुकतीच …

Read More »

“स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्राम…”; जिनिलियाचा मजेशीर व्हिडीओ पाहिला का?

जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर …

Read More »