‘अब की बार प्यार ही प्यार..’, रस्त्यावर उभं राहून अभिनेत्री लोकांना देते ‘Free Hug’!

Free Hug : अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) रिलेशनशीप आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिचा चक्क रस्त्यावर उभं राहत, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मिठी मारत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रिचा सध्या तिच्या ‘वेट लॉस’मुळे देखील चर्चेत आहे.

रिचाने गेल्या तीन महिन्यात तब्बल 15 किलो वजन घटवले आहे. तिचे ही परिवर्तन कौतुकाचा विषय ठरले आहे. चाहते आणि प्रेक्षक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मात्र, सध्या ती फ्री हग (Free Hug) मुळे देखील खूप चर्चेत आली आहे.

पाहा व्हिडीओ :

आपल्या अभिनयाच्या जोरावर रिचाने मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता अली फजलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा या व्हायरल व्हिडिओमध्ये सर्वांना मोफत मिठी मारताना दिसत आहे. लोक तिच्या या उपक्रमाचे खूप कौतुक करत आहेत. लोकांना चांगले वाटावे, म्हणून रिचाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या व्हिडीओमध्ये रिचाने हातात एक साईन बोर्ड धरला आहे. ज्यावर ‘फ्री हग’ असे लिहिले आहे. अभिनेत्रीच्या हातातील हा बोर्ड पाहून लोक तिच्याकडे येतात आणि तिला मिठी मारतात. साहजिकच इतक्या प्रेमाने मिठी मारल्यावर सगळ्यांनाच खूप बरे वाटले असेल.      

हेही वाचा :  शाहरुखच्या पठाणचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अॅक्शन अन् डायलॉग्सनं वेधलं लक्ष

लवकरच बांधणार लग्नगाठ!

अली सध्या हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर रिचा आणि अली लग्नाची तयारी सुरू करतील. रिचा आणि अलीने ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची ओळख झाली होती.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …