Farhan Shibani Wedding : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही आता लवकरच सातफेरे घेणार आहेत. फरहान लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
फरहान आणि शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनीही आपल्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र, आता तारीख समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत, मात्र त्याआधी 19 फेब्रुवारीला फरहान आणि शिबानी महाराष्ट्रीयन रितीरिवाजांनुसार लग्न करू शकतात.
लवकरच कुटुंब खंडाळ्याला रवाना होणार!
हा खाजगी लग्न सोहळा खंडाळा येथील फरहान अख्तरच्या फार्महाऊसवर होणार आहे, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. 18 फेब्रुवारीला सायंकाळी हे कुटुंब खंडाळ्याला रवाना होणार आहे. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी एप्रिलमध्ये भव्य लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सून’ माझी लाडकी!
काही काळापूर्वी फरहानचे वडील, प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लग्नाबाबत अनेक खुलासे केले होते. तसेच, आपली सून शिबानी दांडेकरचे कौतुक करताना जावेद अख्तर म्हणाले होते की, ‘ती खूप चांगली मुलगी आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला ती खूप आवडते. विशेष म्हणजे फरहान आणि शिबानीची केमिस्ट्री चांगलीच जमली आहे.’ फरहान आणि शिबानीने जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha