सतत लघवीला होतेय? सोडियमची उच्च पातळी रक्ताचं करतंय पाणी, खायला सुरू करा ५ पदार्थ

शरीराला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पोषकतत्वांची गरज असते. यातील सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे सोडियम. सोडियम शरीरातील सर्वात महत्वाचे तत्व आहे. शरीरातील पेशींचे कार्य नीट झाले पाहिजे, शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित राहिले पाहिजे आणि रक्तदाब नियंत्रणात राहिला पाहिजे, हे सर्व काम सोडियममुळेच शक्य आहे. सोडियम रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करते. यासोबत सोडियममुळे स्नायूंना नीट काम करण्यासही चालना मिळते.

शरीरात जेव्हा सोडियमची कमतरता जाणवते तेव्हा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील सोडियमच्या कमतरतेमुळे यकृत देखील खराब होऊ शकते किंवा आजारी पडू शकते. त्याचबरोबर शरीरातील सोडियमचे प्रमाणही हानिकारक आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, सोडियमच्या जास्त प्रमाणामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, ताप, उलट्या, जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सोडियमचे अधिक सेवन केल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. म्हणूनच सोडियम संतुलित राहणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​सोडियमची पातळी कशी कमी कराल

सीडीसीच्या अहवालानुसार, दररोज खाल्ल्या जाणाऱ्या 10 प्रकारच्या अन्नामध्ये 40% पर्यंत सोडियम आढळते. ब्रेड, पिझ्झा, सँडविच, कोल्ड कट्स, सूप, बरिटो, स्नॅक्स, चिकन, चीज, अंडी आणि आमलेट हे सोडियमचे प्रमुख स्त्रोत आहेत. आरोग्य तज्ञ नेहमी शरीरातील सोडियम नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देतात. तुम्हालाही तुमच्या शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश करू शकता.

हेही वाचा :  दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

(वाचा – Cataract Symptoms : मोतिबिंदूची ही लक्षणे खूप आधीच दिसतात, वेळीच संकेत जाणून घेतल्यास सर्जरी टाळाल)

​लिंबाचा रस प्यावे

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. यासोबतच लिंबाचा रस शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास लिंबाचा रस पिऊ शकतो.

(वाचा – मेलो तरी चालेल, पण… संजय दत्तने कॅन्सर ट्रिटमेंट घेण्यास दिला होता नकार, असा होता अंगावर काटा आणणारा प्रवास))

सफरचंद

जर तुम्हाला सोडियम नियंत्रित ठेवायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही दररोज सफरचंदाचे सेवन करू शकता. सफरचंदात पेक्टिन मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय त्यात तांबे, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, सेलेनियम, मॅंगनीज, जस्त, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम आढळतात. जे अनेक आजारांवर फायदेशीर आहे. सफरचंदात सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते. सफरचंद किडनीसाठी फायदेशीर आहे.

(वाचा – लठ्ठपणामुळे नसांमध्ये जमा झाले घाणेरडं Cholesterol, 82 किलोच्या बँकरने 5 महिन्यात केलं जबरदस्त Weightloss))

​अंड खावे

अंडी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. यासाठी अंड्याला सुपरफूड असेही म्हणतात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते. यासाठी अंडी खाऊ शकतात. अंड्यामुळे शरीरातील सोडियम नियंत्रित राहण्यास मदत होते.

हेही वाचा :  राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."

​काकडी

काकडीत भरपूर पाणी आढळते. त्यातील 96 टक्के पाणी आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. काकडीत सोडियम देखील फार कमी प्रमाणात आढळते. अर्ध्या काकडीत फक्त 3 ग्रॅम सोडियम आढळते. म्हणूनच सोडियम नियंत्रणात काकडी उपयुक्त मानली जाते. याशिवाय दह्यामध्ये सोडियमचे प्रमाणही खूप कमी असते. दह्यात मीठ आणि साखर खाणे टाळावे. अधिक फायद्यांसाठी तुम्ही त्यात फळे मिसळू शकता.

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …