Bollywood Film Release 2022: बॅक टू बॅक मनोरंजनाची मेजवानी, वर्षभरात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार

Bollywood film in 2022 : कोरोनाची लाट (Corona Virus) काहीशी ओसरताना आता देशभरातील सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होताना दिसत. देशभरातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही महिन्यांत असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे सर्वांचे भरपूर मनोरंजन करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल या वर्षी मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहेत….

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

या यादीत आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट गंगूबाई काठियावाडीचाही समावेश आहे. आलिया भट्ट या चित्रपटात एका हटके भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

आरआरआर (RRR)

‘RRR’ हा एसएस राजामौली दिग्दर्शित एक तेलुगू पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे आणि त्यात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजेच 25 मार्चला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

जर्सी (Jersey)

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची प्रेक्षकही खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे.

हेही वाचा :  शमिता शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिच्या संपत्तीबाबत...

अटॅक (Attack)

जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘अटॅक’ देखील या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून, आता प्रदर्शनाची नवीन तारीख समोर आली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 1 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)

आमिर खान आणि करीना कपूर यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आमिर खानच्या होम प्रोडक्शनमध्ये बनलेला हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …