अथिया-राहुलचा शाही विवाहसोहळा 3 दिवस चालणार

Athiya Shetty KL Rahul Wedding : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर राहुल शेट्टी (Rahul Shetty) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवस त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 

अथिया आणि केएल 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 21 जानेवारीपासून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात होणार आहे. 

अथिया आणि केएल राहुलच्या हळद, मेहेंदी आणि संगीत सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 21 आणि 22 जानेवारीला हळद, मेहेंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 23 जानेवारीला अथिया आणि केएल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 


अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दोघांचेही चाहते आनंदी आहेत. सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली असे अनेक सेलिब्रिटी अथिया आणि केएलच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

अथिया आणि केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. एकमेकांना डेट केल्यानंतर ते आता लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म ‘हिरो’ मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. 

हेही वाचा :  Year Ender 2022 : 'हे' सिनेमे अडकले वादाच्या भोवऱ्यात

संबंधित बातम्या

KL Rahul Wedding : श्रीलंकेविरुद्ध टी20-एकदिवसीय मालिकेला केएल राहुल मुकणार, लग्नासाठी मागितली सुट्टी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …