Jackie Chan : जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्याची लेक ‘बेघर’

Jackie Chan : अभिनेता जॅकी चॅनची (Jackie Chan) गणना जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. जॅकी तब्बल 520 मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण तरीही त्याच्या मुलीकडे राहायला घर नाही आहे. 

जॅकी चॅन अभिनेता असण्यासोबत मार्शल आर्टिस्ट, स्टंटमॅन, सिने-दिग्दर्शक, कोरियोग्राफर, लेखक, निर्माता आणि गायक आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. चाहते नेहमीच त्याचा आदर करतात. पण विवाहबाह्य संबंधामुळे त्याला प्रडंड ट्रोल करण्यात येते. या संबंधातून त्याला एक मुलगी झाली आहे. या मुलीचं नाव एटा एनजी असं आहे. 

जॅकीचं जोआन लिनसोबत लग्न झालं आहे. जॅकी आणि लिनच्या मुलाचं नाव जेसी चॅन असं आहे. जॅकीचे दोन्ही मुलं वेगवेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहेत. जॅकीचा मुलगा खूप चांगली जीवनशैली जगत आहे. तर दुसरीकडे त्याच्या लेकीला मात्र अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जोआन लिन प्रेग्नंट असल्याचं जॅकीला कळल्यानंतर त्याने ते नातं तोडलं. त्यामुळे एटाच्या जन्मानंतर तिला वडिलांचं प्रेम कधी मिळालंच नाही. एका मुलाखतीत जोआन म्हणाली होती,”जॅकीच्या संपत्तीची एटाला गरज नाही”. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एटाने एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये ती म्हणाली,”विवाहबाह्य संबंधामुळे आज मी बेघर आहे”. 

हेही वाचा :  The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले

news reels


जॅकी 2015 साली एका मुलाखतीत म्हणाला होता,”मला असं वाटतं की एटाला माझ्या संपत्तीची काहीही गरज नाही. काही गोष्टींबद्दल न बोलणंच योग्य असतं. पण एटाला जर कधी माझी गरज असेल तर मी नक्कीच तिला मदत करेन”.

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 12 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …