क्रीडा

भारताकडं महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं यजमानपद

Women’s World Boxing Championships 2023: भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. भारतात तिसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी  2006 आणि 2018 मध्ये नवी दिल्ली येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन केलं करण्यात आलं होतं. दोन वर्षापूर्वी जागतिक नियामक …

Read More »

भारत- पाकिस्तानमध्ये फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनलपूर्वी जोस बटलरचा इशारा

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा अंतिम टप्प्यात आलाय. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. तर, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) भारत आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांना इशारा दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल …

Read More »

PAK vs NZ, Semifinal 1 : पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात

PAK vs NZ, T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला गेला. ज्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवत फायनल गाठली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच …

Read More »

PAK vs NZ : केनसह मिशेलची एकहाती झुंज, पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी दिलं 153 धावाचं आव्हान

T20 World Cup 2022, NZ vs ENG : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर  त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता …

Read More »

टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम; अर्शदीप सिंहचीही मोठी झेप

ICC Men’s T20I Player Rankings: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादव त्याच्या बॅटनं धावांचा पाऊस पाडतोय. ज्याचा फायदा त्याला आयसीसीच्या टी-20 रॅंकींगमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. आयसीसीच्या ताज्या टी-20 रँकींगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम आहे. याशिवाय, भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनंही (Arshdeep Singh) आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठी झेप …

Read More »

न्यूझीलंड- पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतलाय. दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांना कडवं आव्हान देतील, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. तसेच आजचा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ …

Read More »

विल्यमसन ब्रिगेड आणि बाबर सेनेत सेमीफायनलचं महायुद्ध, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

New zealand vs Pakistan T20 world Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकुयात. न्यूझीलंडचा संघानं ग्रुप 1 मधील पाच …

Read More »

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, VIDEO

IND vs ENG T20 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत थेट सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. आता 10 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघासाठी फायनलचं तिकिट मिळवण्याकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे. दरम्यान याचसाठी भारत अगदी कसून सराव करत आहे. टीम …

Read More »

समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य

FIFA WC 2022 Qatar : फुटबॉल (Football) खेळाचा विश्वचषक यंदा कतार (Qatar) येथे पार पडत आहे.  20 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना वर्ल्डकपचे अॅम्बेसिडर खलिद सलमान (Khalid Salman) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जर्मन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर ZDF ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, समलैंगिकतेमुळे (Homosexuality) आपल्या “मनाचे, मानसिक प्रकृतीचे  नुकसान होते.” दरम्यान त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे …

Read More »

टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, पण ‘या’3 गोष्टींमुळे वाढलंय टेन्शन

T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे. टीम इंडिया सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फलंदाजी जोरदार होत आहे. मात्र या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची सलामी आतापर्यंत चांगली झालेली …

Read More »

झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यानं लगावलेला ‘स्कूप शॉट’ होतोय व्हायरल, शॉटबद्दल बोलताना सूर्या म्हणतो..

Suryakumar Yadav in T20 World Cup 2022 : यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव धडाकेबाज फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते. विशेष म्हणजे हे सगळे शॉट अगदी हटके होते, पण यातील सर्वोत्तम शॉट शेवटच्या षटकात त्याने …

Read More »

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये ऋषभ पंत असू शकतो संघात, कोच राहुल द्रविड म्हणाला…

Rishabh Pant : झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) शेवटच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. त्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागले होते. पण योग्यवेळी फलंदाजीची संधी मिळूनही ऋषभ पंत अगदी स्वस्तात 3 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या अर्थात सेमीफायनलच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन पंतवर विश्वास ठेवून त्याला …

Read More »

सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलंन केला संघ जाहीर, डेनियल एल्व्सला संधी

Team Brazil for Fifa World Cup 2022 : कतारमध्ये  20 नोव्हेंबर पासून फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA WC 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता प्रत्येक देश आपआपला संघ जाहीर करताना दिसत आहे. दरम्यान सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलनेही आपला संघ घोषित केला आहे. सोमवारी ब्राझीलने आपल्या 26 सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये 39 वर्षीय डेनियल एल्व्सला संधी दिली …

Read More »

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, पहिला सेमीफायनल रंगणार सिडनीच्या मैदानात, कधी, कुठे पाहाल सामना?

T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आता सुपर 12 चे सामने संपले असून सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीसमध्ये पोहोचले आहेत. आता या चार संघामध्ये दोन सेमीफायनलचे सामने खेळवले जाणार असून पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड तर दुसरा सामना भारत आणि …

Read More »

Rohit Sharma : इंग्लंडविरोधातल्या सेमी फायनल सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत, VIDEO समोर

Rohit Sharma Injured : टीम इंडियाच्या (Team India) कॅम्पमधून एक चिंता वाढविणारी बातमी आहे. क्रीडाविश्वातील माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला आहे. अॅडलेडमध्ये नेटवर फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला दुखापतीमुळे वेदना होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी रोहितची दुखापत ही टीम इंडियासाठी एखाद्या वाईट बातमीपेक्षा कमी …

Read More »

भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामन्यावेळी पाऊस आला तर? आयसीसीनं केली आहे खास योजना

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघानं सेमीफायनल गाठली आहे. आता भारत हा ग्रुप 2 मधून सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचल्यामुळे भारताची लढत ग्रुप 1 मधून दुसऱ्या क्रमांकावर सेमीफायनल गाठलेल्या इंग्लंड संघाशी (IND vs ENG) असणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल मैदानात होणार आहे. भारतीय वेळेनुसार …

Read More »

मुंबईत रंगणार सायक्लोथॉन, विविध वयोगटातील सायकलपटू येणार मुंबईच्या रस्त्यांवर, कसा घ्याल सहभाग?

Jio Mumbai Cyclothon : सध्या वाढत्या प्रदूषणात सायकलचा वापर अधिक करणं गरजेचं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने एक भव्य अशी सायक्लोथॉन जिओ मुंबई सायक्लोथॉनच्या (Jio Mumbai Cyclothon) रुपात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स अर्थात बीकेसी ते वरळी या मार्गे ही सायक्लोथॉन पार पडणार असून राजीव …

Read More »

शोएब अख्तरचा ‘यू टर्न’, म्हणतो आता भारत-पाकिस्तानला फायनलमध्ये पाहायचाय!

Shoaib Akhtar : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे (T20 World Cup 2022) सामने रंगतदार होत असून आता केवळ तीन सामने शिल्लक आहेत. यामध्ये दोन सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळवला जाईल. दरम्यान सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेले आहेत. ज्यानंतर आता हे दोघे फायनलमध्ये आमने-सामने येणार अशा चर्चा होत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यालाही …

Read More »

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराटसाठी धोनीचा खास मॅसेज, ज्यानंतर कोहली फॉर्ममध्ये परतला

Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) विराट कोहली सर्वात प्रभावी दिसत आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाजाच्या यादीत टॉपवर आहे. त्यानं अवघ्या पाच सामन्यात सामन्यात तीन अर्धशतकांसह 138.98 च्या सरासरीनं 246 धावा केल्या आहेत. विराट कोहली जवळपास तीन वर्ष खराब फॉर्मशी झुंजत …

Read More »

पहिल्यांदाच आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळाल्यानंतर कोहली म्हणाला, ”मला सपोर्ट करण्यासाठी…

Virat Kohli ICC POTM : विराट कोहली (Virat Kohli) सध्या कमाल फॉर्ममध्ये असून टी20 वर्ल्डकपमध्येतर एकहाती भारताची फलंदाजी सांभाळत आहे. त्याच्या याच कामगिरीसाठी ऑक्टोबरमधील आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार (ICC Player Of the Month) त्याला मिळाला आहे. त्याने विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरी केली. ज्यानंतर त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीसह झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि …

Read More »