मुंबईत रंगणार सायक्लोथॉन, विविध वयोगटातील सायकलपटू येणार मुंबईच्या रस्त्यांवर, कसा घ्याल सहभाग?

Jio Mumbai Cyclothon : सध्या वाढत्या प्रदूषणात सायकलचा वापर अधिक करणं गरजेचं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनने मुंबई पोलिस, महानगरपालिका, एमएमआरडीए, एनसीबी, एमएसआरडीसी आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या भागीदारीने एक भव्य अशी सायक्लोथॉन जिओ मुंबई सायक्लोथॉनच्या (Jio Mumbai Cyclothon) रुपात 13 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स अर्थात बीकेसी ते वरळी या मार्गे ही सायक्लोथॉन पार पडणार असून राजीव गांधी सागरी सेतू अर्थात सी लिंक सायक्लोथॉन पार पडणार आहे. मुंबई शहरातील अशा प्रकारची ही पहिलीच सायक्लोथॉन असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. पर्यावरणपूरक जीवनाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि सायकलिंग सारख्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या पर्यायांबद्दल त्यांना जाणीव करुन देणे हे या स्पर्धेचं उद्दिष्ट असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

कसा घ्याल सहभाग?

सहभाग घेण्यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. यावेळी 599 रुपयांपासून सायक्लोथॉनचे वेगवेगळ्या अंतरासाठी सहभाग घेता येऊ शकतो. यावेळी सर्वात आधी म्हणजे 5 किमीची जॉय राईड असणार आहे. यामध्ये फक्त 10 वर्षांखालील चिमुकल्यांसाठी आणि 10 वर्षांवरील सर्वांसाठी अशा दोन स्पर्धा असतील. तर 10 किमी, 25 किमी (फक्त महिलांसाठी), 50 किमी, 75 किमी आणि 100 किमी अशा वेगवेगळ्या अंतराच्या सायक्लोथॉन पार पडतील. तर सहभाग घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करु शकता..

हेही वाचा :  भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य

Reels

  

लिंक-

https://www.champendurance.com/products/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-mumbai-cyclothon?variant=42540854935711

सहभागी सायकलपटूंना मिळणार पुढील वस्तू

  • सायकलिंग जर्सी
  • चेस्ट नंबर
  • 3D रंगीत पदक
  • स्पोर्टिंग स्लिंग बॅग आणि हेल्दी वस्तू
  • पोषक नाश्ता
  • बॅकअप बॅन सपोर्ट
  • पाण्याची सोय
  • फ्रि फोटोज 
  • इ-टायमिंग सर्टिफिकेट 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …