क्रीडा

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कोणा-कोणाला मिळाली संधी; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

IND vs NZ, Playing 11 : प्रत्येकी तीन सामन्यांची टी-20 आणि वन डे मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. ज्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळवला जात …

Read More »

IND vs NZ, Toss Update : भारतानं गमावली नाणेफेक, न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय

India vs New Zealand, Toss Update : न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील हा दुसरा टी20 सामना असून पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. ज्यानंतर आता दुसरा सामना काही वेळात सुरु होणार …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना, मैदानाची स्थिती, संभाव्य अंतिम 11 वाचा सविस्तर

India vs New Zealand : टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.  भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे खेळवला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आज (20 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात खेळवला …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मध्येही पाऊस व्यत्यय आणणार का? वाचा कशी असेल हवामनाची स्थिती?

India vs New Zealand, 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असून 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या मालिकेत अजून एकही सामना खेळवला गेलेला नाही. कारण मालिकेतील पहिलाच सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. ज्यानंतर आज दुसरा टी20 सामना असणाऱ्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात देखील पावसाची शक्यता असल्याने सामन्यावर पुन्हा एकदा …

Read More »

भारत- न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs NZ Head to Head Records: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड (India tour of New Zealand) दौऱ्यावर गेलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) माउंट मॉन्गनुई स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 …

Read More »

तिलक वर्माचं शानदार शतक; हैदराबादचा मणिपूरवर सात विकेट्सनं विजय

Hyderabad vs Manipur, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद आणि मणिपूरचा (Hyderabad vs Manipur) यांच्यात आज (शनिवार, 18 नोव्हेंबर) लढत झाली. या सामन्यात चमकदार कमगिरी करणाऱ्या हैदराबादच्या संघानं सात विकेट्सनं विजय नोंदवला. हैदराबादच्या विजयात तिलक वर्मानं (Tilak Varma) महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानं 77 चेंडूत नाबाद 126 धावांची शतकीय खेळी केली. ज्यात 14 चौकार आणि सात षटकारांचा समावेश …

Read More »

इंग्लंडचा सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेवर कब्जा; स्टीव्ह स्मिथची दमदार खेळी

England tour of Australia: इंग्लंडविरुद्ध तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय (Australia vs England) मिळवून ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) 92 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडसमोर 281 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 38.5 षटकात 208 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात …

Read More »

मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकलं

Asian Cup Table Tennis tournament: आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित मीमा इटोविरुद्ध पराभूत झाल्यानं मनिका बत्राचे (Manika Batra) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. महत्वाचं म्हणजे, आशियाई कप टेबल टेनिसमध्ये स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणारी ती पहिली महिला टेनिसपटू ठरलीय. कांस्यपदकाच्या लढतीत (Bronze Medal) तिनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची टेबल टेनिसपटू हिना हयातचा पराभव करत इतिहास रचलाय. …

Read More »

निवड समितीचा नवा अध्यक्ष कोण? माजी वेगवान गोलंदाज शर्यतीत आघाडीवर

New BCCI Selection Committee: भारतीय नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयनं शुक्रवारी धक्कादायक निर्णय घेत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लडंकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर निवड समितीच्या कामकाजावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, बीसीसीसीआयनं नव्या निवडसमितीसाठी तातडीनं अर्ज मागवले आहेत. चेतन शर्मानंतर (Chetan Sharma) निवड …

Read More »

स्टीव्ह स्मिथचा खास पराक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पा गाठला

AUS vs ENG 2nd ODI: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England)  यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथनं (Steve Smith) खास पराक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात स्टीव स्मिथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 14000 धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडविरुद्ध मालिकेत स्टीव्ह स्मिथनं आपला फॉर्म कायम ठेवलाय. पहिल्या सामन्यात नाबाद 80 धावांची खेळी करणाऱ्या स्मिथनं दुसऱ्या …

Read More »

वयाच्या 17व्या वर्षी पदार्पण, डेब्यू सामन्यात पाकिस्तानला रडवलं; चेतन शर्माची कारकिर्द

Chetan Sharma: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर 2022) माजी अध्यक्ष चेतन शर्मासह संपूर्ण निवड समतीच बरखास्त केली. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयनं नाराजी व्यक्त करत अनेक मुद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर बीसीसीआयनं शुक्रवारी संपूर्ण निवड समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच नव्या निवड समितीसाठी तातडीनं अर्ज देखील मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारिख 28 …

Read More »

टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार

Australia Tour of India: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरुद्ध (IND W vs AUS W) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर 2022) या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार भारतीय संघ 11 ते 20 डिसेंबर दरम्यान मुंबईत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचं यजमानपद भूषवणार आहे. …

Read More »

बीसीसीआयकडून अध्यक्षांसह संपूर्ण निवड समितीच बरखास्त; 5 मोठे कारण समोर

T20 World Cup fallout: टी-20 विश्वचषक स्पर्धेची स्वप्नवत परिणती गृहीत धरून तरंगणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव बीसीसीआयच्या (BCCI) चांगलाच जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल होण्याची दाट शक्यता होती. यातच भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं शुक्रवारी (18 नोव्हेंबर) संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त (Selection Committee) करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच नव्या निवडसमितीसाठी तातडीनं …

Read More »

IND vs NZ : पहिला सामना पावसामुळं रद्द, आता दुसरी टी20 कधी, कुठं पाहाल? वाचा सविस्तर

India vs New Zealand Match Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या टी20 मालिका सुरु आहे. पण मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये पाऊस असल्यामुळे शुक्रवारी (18 नोव्हेबर) सामना रद्द झाला. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्याची सर्वांना प्रतिक्षा आहे. तर हा दुसरा सामना नेमका कधी, कुठे पाहू शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊ… कधी होणार …

Read More »

विश्वचषकातील पराभव जिव्हारी, चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त, नव्याने अर्ज मागवले

BCCI Sacks National Selection Committee: ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले होते. इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर बीसीसीयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पाचही जागांसाठी अर्ज मागवले आहेत. चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच्या सर्व सदस्यांना बरखास्त करण्यात आले आहे. दरम्यान, निवड समितीच्या नवीन जागा भरेपर्यंत चेतन शर्माच्या नेतृत्वातील निवड समितीच काम …

Read More »

हार्दिकला टी20 संघाचा कर्णधार करण्याची रवी शास्त्री यांची मागणी, कपिल देव यांचं दिलं उदाहरण

Hardik Pandya Team India Captain : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आता टी20 संघात बदलांची मागणी होत आहे. अशामध्ये माजी क्रिकेटर आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील हार्दिकला टी20 संघाचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे. हे बोलताना त्यांना महान क्रिकेटर आणि विश्वचषक विजेते कर्णधार कपिल …

Read More »

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सट्टेबाजी; पाच जणांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Police: टी-20 विश्विचषकाच्या इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यातील अंतिम सामन्यावर सट्टेबाजी (Betting) केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलनं पाच जणांना अटक केलीय. हे आरोपी सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील एका गँगस्टरला पाठवत असल्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलला संशय आहे. दरम्यान, धर्मेश ऊर्फ धिरेन रोशन शिवदसानी, गौरव रोशन शिवदसानी, धर्मेश रसीकलाल वोरा, फ्रॉन्सिस ऊर्फ विकी ऍन्थोनी …

Read More »

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये अर्शदीपची मोठी झेप; टी-20 विश्वचषकातील दमदार कामगिरीचा फायदा

T20 Rankings: नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) जबरदस्त गोलंदाजी केली. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्यानं 10 विकेट्स घेतल्या. ज्याचा फायदा अर्शदीपला टी-20 गोलंदाजी क्रमवारीत (T20 Rankings) झालाय. आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमावारीनुसार, अर्शदीप सिंहनं मोठी झेप घेतली असून तो 22 व्या स्थानावर पोहचलाय. याशिवाय, इंग्लंडचा स्टार युवा …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात- हार्दिक पांड्या

IND vs NZ: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अपयशानंतर भारताचा युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुलसह (KL Rahul) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. तर, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर टी-20 संघाचा जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द करण्यात …

Read More »

फायनल गमावल्यानंतरही पाकिस्तानच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस, प्रत्येक खेळाडूला मिळणार कोट्यवधी

ENG vs PAK : टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) हा फायनलचा सामना इंग्लंडने 5 विकेट्सनी जिंकला. ज्यामुळे पाकिस्तानचं दुसऱ्यांदा विश्वचषक विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं. पण फायनल हरल्यानंतरही पाकिस्तानी संघावर पैशांचा पाऊस पडला असून संघाच्या प्रत्येक खेळाडूला कोटींचे बक्षीस मिळाले आहे. तर संघातील प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला करोडो रुपये कसे आले, ते आम्ही तुम्हाला सांगणार …

Read More »