भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना, मैदानाची स्थिती, संभाव्य अंतिम 11 वाचा सविस्तर

India vs New Zealand : टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.  भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे खेळवला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आज (20 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात खेळवला जाणार आहे. तर या सामन्यावेळी मैदानाची स्थिती, संभाव्य संघ हे सारं काही जाणून घेऊया…

सामना होणाऱ्या बे ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे येथे फलंदाजांना मदत होईल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या दुसऱ्या भागाच वेगवान गोलंदाजांना काही मदत मिळू शकते, तर मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.

कसे असतील संघ?

तर भारतीय संघाचा विचार करता विश्वचषक खेळलेल्या रोहित-विराट या दिग्गजांना विश्रांती दिली गेली आहे. गोलंदाजीतही शमी नसून बुमराहही दुखापतीमुळे बाहेरच आहे. अशामध्ये संजू, श्रेयस, शुभमन अशा बऱ्याच जणांचं पुनरागमन झाल्यामुळे एक नवी प्लेईंग 11 आज दिसणार आहे. यामध्ये सलामीला शुभमन आणि ईशान असू शकतात. त्यानंतर इनफॉर्म सूर्या विराटची जागा घेईल. तर चौथ्या स्थानावर श्रेयस आणि संजू यांच्यातील एकजण असेल. तर त्यानंतर कॅप्टन हार्दिक, पंत हे दिग्गज असतील. मग सुंदर आणि हुडा यांच्यातील एकजण असू शकतो. तर गोलंदाजीत चहल या एका फिरकीपटूसह अर्शदीप, उमरान आणि भुवनेश्वर हे वेगवान गोलंदाज असू शकतात.

हेही वाचा :  PAK vs NZ, Semifinal 1 : पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात

Reels

संभाव्य भारतीय संघ :
शुभमन गिल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर/दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघाचा विचार करता ते विश्वचषकात घेऊन उतरलेल्या संघासोबतच उतरु शकतात, ज्यात काहीच बदल असू शकतात. कर्णधार म्हणून केनच असेल तर ग्लेन हा कमाल फॉर्मात असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

असा असू शकतो न्यूझीलंडचा संघ –

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …