IND vs NZ : पहिला सामना पावसामुळं रद्द, आता दुसरी टी20 कधी, कुठं पाहाल? वाचा सविस्तर

India vs New Zealand Match Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या टी20 मालिका सुरु आहे. पण मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये पाऊस असल्यामुळे शुक्रवारी (18 नोव्हेबर) सामना रद्द झाला. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्याची सर्वांना प्रतिक्षा आहे. तर हा दुसरा सामना नेमका कधी, कुठे पाहू शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारतीय वेळेनुसार दुसरा टी20 सामना उद्या अर्थात रविवारी दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

Reels

हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा टी20 सामना माउंट मॉन्गनुई येथील बे ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

टी20 मालिकेनंतर होणार एकदिवसीय मालिका

दुसऱ्या टी20 सामन्यानंतर तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नॅपियर येथे खेळला जाईल. ज्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओव्हल येथे पार पडणार आहे.

हेही वाचा :  एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …