एकटीने मुलींना असं घडवलंंय, सुष्मिता सेनकडून प्रत्येक पालकांनी शिकाव्यात या पॅरेंटिंग टिप्स

​पालक होऊन सुष्मिता आनंदी

सुष्मिताकडून ही सर्वात मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे खूप कमी वयात तिने मुलं दत्तक घेतलं आहे. अशा परिस्थितीत, तरुण वय, एकीकडे अभिनेत्री असणे या सगळ्या गोष्टी सुष्मिताने कोणालाही दत्तक घेण्यासाठी पुरेसे नव्हते. इतकंच नाही तर सुष्मिताच्या या निर्णयावर अनेक टीका होत होत्य. पण तिची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई-वडील झाल्याचा सुष्मिताला खूप आनंद झाला होता. कदाचित याच कारणामुळे ती तिच्या मुलीला 100 टक्के देऊ शकली. तुम्ही जे काही करताय त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही त्यात आनंदी आहात हे महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्ही त्याकडे तुमचे पूर्ण लक्ष देऊ शकणार नाही.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​प्रामाणिक आणि स्पष्ट रहा

पालक होण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय तुम्ही स्वतःला आणि मुलांना न्याय देऊ शकत नाही. मुलांचे असे अनेक प्रश्न असतात, जे तुम्हाला अस्वस्थ करतात. म्हणूनच हे खूप महत्वाचे आहे की जोपर्यंत तुम्ही स्पष्ट राहत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना बरोबर उत्तर देऊ शकणार नाही. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने सांगितले होते की, एकदा तिची मोठी मुलगी रिनी शाळेतून परतली आणि सुष्मिताला तिच्या वडिलांबद्दल विचारले. त्यावेळी सुष्मिताने शिवलिंगाकडे बोट दाखवत ते तुझे वडील असल्याचे सांगितले. तुम्हीही सिंगल पॅरेंटिंगचा विचार करत असाल तर असे प्रश्न तुमच्यासमोरही निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा :  तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​मुलींशी पत्राने संवाद साधा

सुष्मिता सेनला नेहमीच सर्वोत्तम आई व्हायचं होतं. तिला सर्व ज्ञान तिच्या मुलांना द्यायचे होते. त्यामुळेच सुष्मिताने यासाठी योग्य पर्याय म्हणून पत्रव्यवहाराचा पर्याय निवडला होता. सुष्मिता वेळोवेळी आपल्या मुलींचा उत्साह वाढवण्यासाठी संवाद साधत असते. असेच एक पत्र तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​नवीन गोष्ट शिकण्यासाठी मुलांची करा मदत

तुम्हाला चांगले पालक व्हायचे असल्यास, तुमच्या मुलांना नेहमी काहीतरी नवीन शिकण्यास मदत करा. मुलांना शिकण्याची जिद्द असते. तरुण वयात ते पटकन गोष्टी शिकतात. याचा फायदा घ्या आणि त्यांना नवीन गोष्टी शिकवा. सुष्मिता तिची मोठी मुलगी रिनीच्या कथ्थक नृत्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते आणि ती सोशल मीडियावर लहान मुलीच्या अनेक भाषांमध्ये बोललेल्या कविता पोस्ट करते.

पालक हे मुलांसाठी आदर्श असतात. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागता, ते भविष्यातही तेच वागतील. त्यामुळे त्यांना चांगल्या पालकांप्रमाणे वाढवा.

हेही वाचा :  हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,आजच खायला घ्या जीव वाचवणारा हा पदार्थ

(वाचा – आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …