अ‍ॅसिडिटीसाठी डायजीन सिरप घेताय?, आत्ताच सावध व्हा, सरकारने जारी केला अलर्ट

DCGI Advisory For Digene Gel: पोट दुखत असेल किंवा पोट खराब झाल्यास तुम्हीदेखील डायजीन जेलचे सेवन करता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अँटासिड सिरप आणि डायजीन जेल संदर्भात डॉक्टरांनी अॅडवायजरी जारी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे.  या अलर्टनंतर डायजीन जेलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच. औषध बनवणाऱ्या कंपनीनेही बाजारात उपलब्ध असलेले औषधे परत मागवली आहेत. एका ग्राहकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) दिलेल्या डॉक्टरांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात रुग्णांना या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, हे औषध घेतल्यानंतर रुग्णावर काही रिअॅक्शन किंवा अॅलर्जी झाली असेल तर त्याची नोंद करुन ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, डॉक्टरांना संशयास्पद रुग्ण आढळल्यास लगेचच त्याची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

Abbott नावाच्या कंपनीकडून हे औषध तयार केले जाते. त्यामुळं या कंपनीच्या सिरपचे अजिबात सेवन करु नये. गोव्याच्या कंपनीत तयार झालेले सिरप लगेचच परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. DCGI ने राज्य/केंद्रशासित प्रदेश/क्षेत्रीय आणि उप-क्षेत्रीय अधिकार्‍यांना या उत्पादनाची बाजारपेठेतील हालचाल, विक्री, वितरण, साठा यावर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, जर उत्पादन बाजारात असेल तर त्याचे नमुने घ्या आणि ड्रग्ज-कॉस्मेटिक कायदा व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा :  “अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर…”, रोहित पवार आक्रमक

काय आहे प्रकरण?

डायजीन सीरप खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीने 9 ऑगस्ट 2023 रोजी एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत डायजीन जेलमध्ये मिंट फ्लेवर असलेल्या बॉटलमधील सिरपची चव गोड आणि हलक्या गुलाबी रंग आहे. तर, त्याच बॅचमधील एका बॉटलमधील सिरपची चव थोडी कडवट आहे. त्याचबरोबर त्याता दर्पही उग्र आणि रंग थोडा सफेद आहे. ग्राहकाच्या या तक्रारीनंतर सिरप तयार करणाऱ्या एबॉट कंपनीने हे उत्पादनाचे वितरण आम्ही थांबवत असून बाजारातूनही परत मागवले जात आहे, असं डीसीजीआयला कळवलं आहे. 

कंपनीने काय म्हटलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एबॉट कंपनीच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सिरपची चव आणि गंध यावरुन ग्राहकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळं गोवाच्या फॅक्ट्रीत तयार केलेल्या डायजीन जेल अँटासिड औषधाचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, आतापर्यंत कोणताही चिंताजनक परिस्थिती समोर आली नाहीये. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …